करवीर : कसबा बीडच्या शंभो महादेव मंदीरात दीपोत्सव साजरा

सावरवाडी प्रतिनिधी :
बाराव्या शतकातील प्राचीन संस्कृतीचा वारसा जपलेल्या आणि कोरीव लेण्याची साक्ष देण्याऱ्या कसबा बीड (ता करवीर) येथील शंभो महादेव मंदीरात त्रिपूरारी पौर्णिमेनिमित्य संस्कार भारती कोल्हापूर तर्फे दीपोत्सव साजरा करण्यात आला.
संस्कार भारती प्राचीन कला विधा प्रमुख डाॕ.योगेश प्रभुदेसाई यांनी कसबा बीड च्या ऐतिहासिक विरगळां ची माहिती ग्रामस्थांना दिली. यावेळी सिध्दराज पाटील आणि वेदा सोनुले यांच्या गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध झाले .
याप्रसंगी सरपंच .सर्जेराव तिबिले ,उपसरपंच वैशाली सुर्यवंशी शंभो महादेव मंदिर व्यवस्थापक रघुनाथ पाटील,ग्रामस्थ,संस्कार भारती कोल्हापूरचे उपाध्यक्ष.चंद्रशेखर फडणीस,.लक्ष्मीदास जोशी,मार्गदर्शक प्रा.व्यंकटेश बिदनूर ,.वरदा बिदनूर, शाम कुरळे, .कमल कुरळे,सौ.स्नेहा वाबळे,श्रीमती चंद्रिका निकम ,ऋग्वेद बिदनूर उपस्थित होते.