कागल : राजे फाउंडेशन संचलित सिद्धिविनायक नर्सिंग होमच्यावतीने हृदयविकार, मूत्रविकार ,अस्थीविकार मोफत तपासणी शिबीराचे आयोजन

कागल प्रतिनिधी विजय मोरबाळे
राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन, कागल संचलित सिद्धिविनायक नर्सिंग होम यांच्यामार्फत सोमवार दि . २५ ते शनिवार दिनांक ३० एप्रिल पर्यंत हृदयविकार, मूत्रविकार , अस्थी विकार व जनरल तपासणी मोफत केली जाणार आहे .सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत तपासणी शिबिर होणार आहे . सिद्धिविनायक नर्सिंग होमचे तज्ञ व नामवंत डॉक्टर यांच्याकडून ही तपासणी केती जाणार आहे .
या शिबीरात आवश्यकतेनुसार मोफत ईसीजी व शुगर तपासणी केली जाईल. याचबरोबर रक्त चाचण्या, एक्स-रे, सोनोग्राफी, एमआरआय , सिटीस्कॅन हे सवलतीच्या दरात केली जाणार आहेत . आवश्यक वाटल्यास पुढील उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सिद्धिविनायक नर्सिंग होम टाकाळा कोल्हापूर येथे मोफत केले जाणार आहेत . हे शिबीर बापूसाहेब महाराज चौकातील दुधगंगा डेअरीच्या पहिल्या मजल्यावरील सिद्धिविनायक नर्सिंग होम येथे होणार आहे .
कागल व परिसरातील नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा . असे आवाहन राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन, कागल संचलित सिद्धिविनायक नर्सिंग होम यांचेवतीने करण्यात आले आहे .