कागल : राजे फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षार्थींसाठी रविवारी (ता.२७)सराव परीक्षा

कागल,प्रतिनिधी. विजय मोरबाळे
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढावे. त्यांच्यामध्ये धाडस व आत्मविश्वास निर्माण व्हावा.या उद्देशाने राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनमार्फत जाहीर केलेली स्पर्धा सराव परीक्षा रविवारी (ता.२७)घेण्यात येणार आहे.या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या नावे नोंदविलेल्या विद्यार्थ्यांनी सकाळी दहा वाजता कागल-मुरगुडवरील श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुल कागल येथे उपस्थित रहावे. असे आवाहन राजे फाउंडेशनच्या वतीने शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा व शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
हा कार्यक्रम दोन सत्रात होणार आहे.पहिल्या सत्रात सकाळी 10 वाजता स्पर्धा परीक्षेचे उद्घाटन
शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांच्या हस्ते व कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. पेपर 11.30 ते 1 या वेळेत होईल तर दुसऱ्या सत्राचे उद्घाटन दुपारी 1.30 वाजता शाहू ग्रुपचे प्रमुख राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते व राजे बँकचे अध्यक्ष एम पी पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.यावेळी ए बी फौंडेशन कोल्हापूर चे संस्थापक प्रा.दीपक अतिग्रे व अनुराधा पाटील पोलीस उपनिरीक्षक राधानगरी यांचे स्पर्धा परीक्षा व मुलाखत तंत्र या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे
तहसीलदार, गटविकास अधिकारी ,एम पी एस सी, पोलीस खात्यातील सर्व पदे, शिक्षक (टी.ई.टी),पोलीस, तलाठी, म्हाडा, आरोग्य विभाग, सैनिक संरक्षण खात्यासह इतर विविध पदांच्या भरतीसाठी होणाऱ्या परिक्षा व स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना या सराव परिक्षेचा फायदा होणार आहे. शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या या सराव परिक्षेचा फाउंडेशनमार्फतचा हा पहिलाच प्रयोग आहे.
ही परीक्षा पूर्णपणे मोफत होणार असून नामांकित क्लासेसच्या सहकार्याने ही परीक्षा होत आहे. तज्ज्ञांमार्फत या परीक्षेसाठीच्या प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत .
विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन फौंडेशनच्या वतीने केले आहे.