शिंदेवाडी येथे कोरोनाच्या लसीकरणास प्रारंभ

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शिंदेवाडी (ता. कागल) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव व शिंदेवाडी ग्रामपंचायती च्या वतीने कोरोनाच्या लसीकरणास आज ( दि-५ ) प्रारंभ झाला .आज दिवसभरात २२६ जणांना लस देण्यात आली .
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव
व शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने ४५ वर्ष पूर्ण असलेल्या नागरिकांसाठी कोविडसाठी लस श्रीराम विद्यामंदिर येथे देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले.आरोग्य केंद्रामार्फत दोन दिवस लसीकरणाची ही मोहीम राबविण्यात येणार आहे .
या मोहिमेमध्ये वैद्यकिय अधिकारी डॉ.रुपाली लोकरे , डॉ. टी. जी.शिंदे ,आरोग्य सहाय्यक जयवंत गायकवाड, सचिन चिखले, आरोग्य सेवक सुनील जाधव ,आरोग्य सेविका के.एम.गुरव,एम. आर .समाधान ,आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांच्यासह सरपंच रेखा माळी,उपसरपंच रामेश्वरी खराडे ,ग्रामपंचायत सदस्य दत्तामामा खराडे, अॅड .जीवनराव शिंदे, अविनाश गोसावी ,छाया शिंदे, आक्काताई वंदूरे ,रमेश ढेरे,रमेश माळी ,ग्रामसेवक स्वरणीम शिंदे आदि उपस्थित होते .