कागल : आघाडी सरकारचा कागलमध्ये भाजपकडून निषेध ; “त्या” नोटीसची गैबी चौकात होळी

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस यांना महाविकास आघाडी सरकारने बेकायदेशीरपणे नोटीस लागू केल्याच्या निषेधार्थ कागल तालुका भाजपच्या वतीने निषेध केला.यावेळी काढलेल्या निषेध मोर्चास बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूतळ्यापासून प्रारंभ झाला.मुख्य रस्त्यावरून आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मोर्चा गैबी चौकात आलेनंतर फडवणीस यांना लागू केलेल्या नोटीसची होळी केली.
यावेळी शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,संचालक सुनिल मगदूम,अरूण सोनुले, तालुकाध्यक्ष संजय पाटील, बाळासो हेगडे, हिदायत नायकवडी यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाची मनोगत व्यक्त केले.
मोर्चामध्ये शाहूचे संचालक यशवंत माने, युवराज पाटील, डॉ डी.एस.पाटील, सचिन मगदूम,शिवाजी पाटील,सतिश पाटील,संजय नरके,भाऊसो कांबळे,सुजाता तोरस्कर,राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर,संचालक राजेंद्र जाधव, आप्पासाहेब भोसले,सुशांत कालेकर , असिफ मुल्ला,प्रमोद कदम ,गजानन माने,दीपक मगर , अमोल शिवइ, बाळासो नाईक, सौ सुधा कदम,सौ रेवती बरकाळे, पोलिस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
शेलक्या घोषणा
मोर्चेक-यांनी भाजपचा विजय असो,देवेंद्रजी तुम आगे बढो,हम तुम्हारे साथ है अशा समर्थनाच्या घोषणांसह महाविकास आघाडी सरकारचा निषेधाच्या शेलक्या शब्दांतील घोषणा दिल्या .यामध्ये आघाडी सरकारचं,करायचं काय- खाली डोकं वर पाय,आघाडीच्या सुलतानी कारभाराचा धिक्कार असो अशा घोषणांचा समावेश होता.