कडगाव हायस्कूल, कडगाव विनंती एस. टी. थांब्याचे उद्घाटन.

कडगाव प्रतिनिधी :
कडगाव येथील कडगाव हायस्कूल व श्री .समर्थ कनिष्ठ महाविद्यालय कडगाव येथे शाळेसमोर एस टी थांब्याची विद्यार्थ्यांची गरज व मागणी लक्षात घेता विनंती एस टी थांबा मंजूर करण्यात आलेला आहे. नुकतेच याचे उद्घाटन खेडगे एरंडपे चे लोकनियुक्त सरपंच सुरज सर्जेराव पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक डॉ. आर .डी .पोवार ए .डी. देसाई, ए .एम .भडगावकर बी .एस .राणे ,एस .एस. चोरगे, सी .एस .लिमकर परिवहन समितीचे सचिव सी .एस. मासाळ ,वजीर मकानदार ,सर्जेराव पाटील ,रघुनाथ पाटील ,अजित दादा कांबळे ,सचिन गुरव व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. एस टी थांबा मंजूर करणे कामी गारगोटी आगाराचे व्यवस्थापक अनिकेत चौगले ,आगार प्रमुख सागर पाटील ,कडगाव वाहतूक नियंत्रक शिवाजी फराकटे ,प्रवीण महाडगुत यांचे सहकार्य लाभले .बस थांबा मंजूर केल्याबद्दल विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.