कडगाव हायस्कूल व श्री .समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, कडगाव विद्यालयात रानभाज्या महोत्सव संपन्न

कडगाव प्रतिनिधी :
कडगाव येथील कडगाव हायस्कूल व श्री .समर्थ कनिष्ठ महाविद्यालय कडगाव या विद्यालयात रानभाज्या महोत्सव संपन्न झाला .रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षक श्री. ए. एम. भडगावकर व ए. डी. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले . अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. आर. डी .पोवार होते . प्रारंभी रानभाज्यांचे महत्त्व व आवश्यकता याविषयी राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक श्री . सी .एस. मासाळ यांनी माहिती दिली. रानभाज्यातून मिळणाऱ्या जीवनसत्त्वांची माहिती ज्येष्ठ लिपिक वजीर मकानदार यांनी करून दिली .शालेय विद्यार्थ्यांनी रानातून रानभाज्या जमा केल्या होत्या .यामध्ये भांगर ,अळू, उंदीरकान, भोवळीची पाने, मोहर, तांदळी ,कुर्डू, मोरशेंडा, पात्री ,आगाडा, आळंबी ,अंबाडा, टाईकळा ,नाल अशा विविध रानभाज्यांचे स्टॉल विद्यार्थ्यांच्या मार्फत ठेवण्यात आले होते. शिक्षक ,पालक, कॉलेजचे विद्यार्थी यांनी या रानभाज्यांचा आस्वाद घेतला .कार्यक्रमाचे संयोजन सत्यजित चोरगे यांनी केले.