पत्रकार डी. वाय. देसाई यांना कोल्हापूर जिल्हा डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स असोशियशन सन २०२२ चा ऊत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर.
विद्यार्थिनी इन्स्टिट्यूट पाल या शैक्षणिक संस्थेच्या भरभराटीत मोलाचा वाटा व संस्था प्रतिनीधी म्हणून अलौकीक कामगिरी करणाऱ्या या पत्रकाराने भुदरगड तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकिय, शासकिय,सहकार आदि सर्व विषयावर सडेतोड लेखन करून अनेक सामाजिक प्रश्नाना वाचा फोडली आहे.

गारगोटी प्रतिनीधी :
आपल्या पत्रकारितेच्या वाटचालीत अनेक पुरस्कारांनी सन्मानीत असलेले दैनिक पुढारीचे भुदरगड तालुक्यातील मिणचे खुर्द वार्ताहर डी वाय देसाई यांना या वर्षीचा कोल्हापूर जिल्हा डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स असोशियशन सन २०२२ चा ऊत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहिर झाला आहे.
या पुर्वी डी वाय देसाई हे जिल्हा परिषदेच्या आचार्य अञे सर्वोत्कृष्ठ पत्रकार पुरस्काराचे तालूक्यातील प्रथम मानकरी ठरले होते. सन २०१९ सालीश्रावस्ती संस्थेचा राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कारानेही त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे या शिवाय सन २०२० साली न्यूज गंगाधर चा उत्कृठ पत्रकार पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.
विद्यार्थिनी इन्स्टिट्यूट पाल या शैक्षणिक संस्थेच्या भरभराटीत मोलाचा वाटा व संस्था प्रतिनीधी म्हणून अलौकीक कामगिरी करणाऱ्या या पत्रकाराने भुदरगड तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकिय, शासकिय,सहकार आदि सर्व विषयावर सडेतोड लेखन करून अनेक सामाजिक प्रश्नाना वाचा फोडली आहे. त्यांच्या अनेक बातम्यांची शासकिय स्तरावर दखल घेतली गेली. अनेक गोरगरीब उपेक्षीत घटकांना मदत करत एक प्रामाणिक निष्कलंक निर्भिड पत्रकार म्हणून भुदरगड तालूक्यात डी वाय देसाई यांनी विशेष अशी ओळख निर्माण केली आहे.
या पत्रकार संघटनेच्या जिल्हा उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानीत झालेने, डी वाय देसाई यांच्यावर सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.