ताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरसेवकांना पैसे देणं ही माझी चूक होती ; आमदार विनय कोरे यांनी दिली कबुली

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे

कोल्हापूर महापालिकेत आपला महापौर करण्यासाठी आपण एका -एका नगरसेवकाला 35 -35 लाख रुपये दिले. त्यामुळे माझ्याकडं बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला असं सांगत नगरसेवकांना पैसे देणं ही आपली चूक होती अशी कबुली आमदार विनय कोरे यांनी दिली. वडगांव बाजार समिती निवडणूकीच्या निमित्तानं पॅनलची घोषणा करताना पत्रकार बैठकीत ते बोलत होते. लोकशाहीमध्ये निवडणूका व्हाव्यात पण त्यामध्ये लोकशाहीचं पावित्र्य सुद्धा जपलं जाणं गरजेचं असल्यामुळं मर्यादित मतदारांच्या निवडणूकां मधल्या चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी त्या बिनविरोध होणं अधिक चांगलं असंही आ. कोरे यांनी नमूद केलं .
आमदार कोरे म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेत जनुसराज्य पक्षाचा महापौर करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यावेळी पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक हे एकत्र होते. तर, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि मी स्वत: एकत्र होतो. महानगरपालिकेत नगरसेवकांना लाखो रुपये दिल्यामुळे सर्वसामान्य माणसांकडून आपला आदर कमी होणार आहे. प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची राजकीय इर्षा कमी होणार आहे.

पेठ वडगाव (ता. हातकणंगले) बाजार समितीची निवडणूक आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार महादेवराव महाडिक, आरोग्य राज्यंमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे एकत्रित लढणार असल्याचेही श्री कोरे यांनी सांगितले. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी श्री कोरे यांनी महाविकास आघाडीतील कार्यकर्ते, नेत्यांना आवाहनही यावेळी केले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks