बहुजन समाजातील तरुणांना व्यवसायाद्वारे स्वतःच्या पायावर उभे करणे माझे कर्तव्य : समरजितसिंह घाटगे; ईस्पुर्ली येथे केली उद्यमशिल तरूणाच्या यशस्वी उद्योगाची पाहणी

नंदगाव प्रतिनीधी : सचिन चौगले
तरुणांनी नोकरीबरोबर व्यवसायाच्या पर्यायाचाही विचार करावा. त्यासाठी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचा वंशज म्हणून अश्या उद्योगशील तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. किंबहुना बहुजन समाजातील तरुणांना व्यवसायाद्वारे स्वतःच्या पायावर उभे करणे हे माझे कर्तव्य समजतो. असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
इस्पुर्ली ता.करवीर येथील अक्षय पवार या तरुणाने राजे बँकेच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनेच्या माध्यमातून अक्षय पवार यानेयशस्वीपणे उभारलेल्या पोल्ट्री, पॉलीहाउस क्राकरी उद्योगांच्या पाहणी वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, मराठा समाजातील तरुणांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी व इतर व्यवसाय कर्जाविषयी येणाऱ्या अडचणी व ही योजना अधिक परिणामकारकरीत्या राबवून तरुणांना उद्योग व्यवसायात सहकार्य करावे. यासाठी अशा तरुणांना प्रोत्साहन देऊन त्यापासून इतर तरुणांनी प्रेरणा घ्यावी. यासाठी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेटी देत आहे.असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी श्री.घाटगे म्हणाले, मराठा समाजातील तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योगांकडे वळावे,यासाठी सारथी संस्थेच्या मार्फत विविध उपाय योजना व त्यांना मदतीचे उपक्रम राबवले जात आहेत. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कडून अर्थसहाय्यही पुरवले जात आहे. मात्र अनेक तरुणांसमोर नेमका कोणता उद्योग करावा. याबाबत संभ्रम आहे. त्यासाठी सारथी अंतर्गत कौशल्य विकास सारख्या लघु उद्योगाचा समावेश करून व्याप्ती वाढविल्यास या तरुणांपुढे उद्योगाबाबत अनेक पर्याय उपलब्ध होतील. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी गूळ,कोल्हापुरी साज अशी कोल्हापूरची वैशिष्ट्य असलेले पारंपरिक व्यवसाय उपलब्ध आहेत. मात्र त्यासाठीचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यासाठी सारथी कडे पाठपुरावा सुरू आहे.अशा प्रशिक्षण घेतलेल्या तरूणांना राजे बँकेसह इतर बँका अर्थसहाय्य करून प्रोत्साहन देतील. असेही ते म्हणाले.
यावेळी शाहूचे संचालक मारूती निगवे,भुपाल पाटील,बाबुराव पाटील,शिवाजी पोवार,आर के चिंदगे बाळू दळवी,चेतन चव्हाण,सरपंच राजाराम पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील ,उपसरपंच राजाराम चौगुले संजय पोर्लेकर,आनंदा चिंदगे, दत्तात्रय गायकवाड ,सुभाष पोवार,पदमसिंह पाटील यांच्यासह शेतकरी व तरूण उपस्थित होते. यावेळी त्यांनी हनुमान पाणीपुरवठा संस्था व कमळाई बाळकू पोवार वाचनालयास ही भेट दिली.