आरोग्याचे आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी मास्क वापरणे अत्यावश्यक : प्राचार्य डॉ.व्ही.एम पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
`कोरोना महामारीच्या गंभीर परिस्थितीमध्ये मास्क वापरून प्रत्येकाने स्वतःला व इतरांना सुरक्षित केले. मास्कमुळे केवळ कोरोनाचाच प्रतिकार होतो, इतकेच नव्हे तरी इतरही अनेक साथीच्या रोगापासून बचाव करता येतो, म्हणून आरोग्याच्या आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी मास्क वापरणे अत्यावश्यक आहे.’ असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.व्ही.एम. पाटील यांनी केले.
ओंकार वेल्फेअर फाउंडेशन कोल्हापूर आणि रिलायन्स फाउंडेशन मुंबई यांचे वतीने न्यू कॉलेज कोल्हापूर येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत मास्क वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले `महाविद्यालयांमध्ये तेवीस तारखेचे आयोजित केलेल्या मोफत लसीकरणाच्या त्याचा फायदा सर्वांनी घ्यावा आणि शंभर टक्के लसीकरणाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी साथ द्यावी’
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.टी.के.सरगर होते.अध्यक्षस्थनावरुन बोलताना ते म्हणाले `मास्क लसीकरण आणि सामाजिक अंतर या सूत्रानुसार आपण कोरोणाच्या संकटावर मात करू शकलो. प्रत्येकाने याचा वापर करून स्वतःला व कुटुंबाला निरोगी ठेवावे’
या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयांमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या एक हजार विद्यार्थ्यांना मास्कचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले.
ओंकार फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अमोल सरनाईक यांनी ओंकार फाउंडेशनच्या माध्यमातून चालू असलेल्या विविध सामाजिक कार्यक्रमाची `अन्नदान ,आरोग्य शिबिरे, तंत्रज्ञानात्मक माहितीची शिबिरे,लसीकरण शिबिर, वृक्षारोपण व पर्यावरण संगोपन कार्यक्रम यासंदर्भात माहिती दिली.
कार्यक्रमाचे स्वागत प्रा. टी एस पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रा.जे.बी.दिंडे यांनी केले. आभार प्रा. संग्राम पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी रिलायन्स फाऊंडेशनचे श्री मारुती खडके,श्री मंगेश मंडलिक,श्री कृष्णात पाटील ओंकार वेल्फेअर फाऊंडेशनचे श्री ओंकार मोरे,श्री भाऊ पाटील यांचेसह प्रा.आर एस किरूळकर व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.