गोकुळ मध्ये सर्वसामान्य जनतेसाठी प्रामाणिक काम करणार : नंदकुमार ढेंगे

मुरगूड प्रतिनीधी : विजय मोरबाळे
विश्वनाथ राव पाटील मुरगुड सहकारीबँकेचा संचालक म्हणून प्रामाणिक काम केले, त्याचं फळ म्हणून गोकुळ वर संधी मिळाली. सर्व सामान्य कार्यकर्त्याला आमदार प्रकाश आबिटकर यांनी संधी दिली. गोकुळ संघाच्या कामामध्ये भविष्यात सर्व सामान्य जनतेच्या हिताचे काम पारदर्शी पणे करीन. गोकुळ संघात एक वेळा नोकरीसाठी प्रयत्न केला त्याच संघात संचालक झालो. असे मत गोकुळ दुध संघाचे संचालक नंदकुमार ढेंगे यांनी केले.अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील होते.
गोकुळ दुध संघाच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल या बँकेचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. नंदकुमार ढेंगे यांचा अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे हस्ते सत्कार करणेत आला.सत्कार प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष वसंतराव शिंदे, संचालक विठ्ठल भारमल, . एकनाथ मांगोरे, साताप्पा पाटील, आनंदराव पाटील, बाळासाहेब पाटील, सुधीर सावर्डेकर, सौ. रेवती सुर्यवंशी, सौ. लक्ष्मी जाधव व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्र्वास चौगले व सर्व कर्मचारी उपस्थित होते.