ताज्या बातम्यामहाराष्ट्र
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर निपाणी- फोंडा मार्गावरील लिंगनूर चेकपोस्टवर तपासणी सुरू

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
देशात सर्वप्रथम कर्नाटकात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर निपाणी- फोंडा मार्गावरील लिंगनूर कापशी येथे मुरगूड पोलिसांनी तपासणी नाका उभारला आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व वाहनांची सपोनि विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली कसून तपासणी केली जात आहे. निपाणी-फोंडा मार्गावरून कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात तळकोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सीमाभागात तपासणी नाके उभे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लिंगनूर कापशी येथे तपासणी नाका उभारला आहे. या नाक्यावर चोवीस तास चार पोलीस तैनात केले आहेत.