अंतराळ संशोधनातील शोधकता जोपासावी : प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
अंतराळ संशोधनात नवनव्या संधी उपलब्ध होत असून त्याचा फायदा विद्यार्थी व तरुणांनी घ्यावा. तसेच अंतराळ संशोधनातील उच्चतम शोधकता जोपासावी. असे आवाहन प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी केले. ते गगनबावड्यातील पद्मश्री डॉ. ग .गो. जाधव महाविद्यालयात भौतिक शास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या सुभांशू शुक्ला एक अंतराळ सफर या भितीपत्रकाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. स्वागत प्रा. सुप्रिया घाटगे यांनी केले
.प्रास्ताविकात प्रा. शितल मोहिते यांनी भित्तिपत्रकाचा उद्देश आणि महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी उपप्राचार्य डॉ. संदीप पानारी, प्रा. रोहित सरनोबत, प्रा. अरुण गावकर, प्रा.सौरभ देसाई,प्रा.हुसेन फारस , प्रा.अमोल कुंभार प्रा. सौ.देवयानी पारगावकर व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा.ऐश्वर्या धामोडकर यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. सतीश देसाई व संस्था सचिव प्रा. डॉ.विद्या देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.