दत्तामामा खराडे यांना आंतरराज्य गौरव पुरस्कार

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शिंदेवाडी ता- कागल येथील सरपंच व बिद्री साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय तुकाराम खराडे यांना आंतरराज्य गौरव पुरस्कार नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फौंडेशन व हेल्थ अॅड नेचर
डेव्हलपमेंट सोसायटी बेळगांव यांच्या वतीने
देण्यात आला आहे . या पुरस्काराचे वितरण ८ ऑक्टोबर रोजी बेळगांव ( कर्नाटक ) येथे होत आहे .
कर्नाटक , महाराष्ट्र व गोवा राज्यातील सामाजिक ,शैक्षणिक ,वैद्यकीय ,इंजिनियरींग , बांधकाम , सराफ व सहकार या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित
करण्यात येते .दत्तात्रय खराडे यांना आंतरराज्य सामाजिक सेवा व आदर्श सरपंच गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे . सन्मानचिन्ह , सन्मानपत्र , माजी केंद्रीय मंत्र्यांचे अभिनंदन पत्र , म्हैसुर फेटा व चंदनाचा कायम स्वरूपी हार असे पुरस्काराचे स्वरूप आहे .
दत्तात्रय खराडे हे शिंदेवाडी गावचे २६ वर्ष सरपंच राहिले आहेत . जिल्हा परिषदेच्या यशवंत सरपंच पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे .बिद्री सह साखर कारखान्याचे माजी हॉईस चेअरमन व विद्यमान संचालक आहेत . गडहिग्लंज बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक आहेत . कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून ३९ वर्ष काम पहात आहेत . तसेच विविध संस्थामध्ये चेअरमन , संचालक म्हणूनही काम पहात आहेत .