एकात्मिक बाल विकास सेवा योजना :अपात्र बचत गट निविदाधारकांनी सात दिवसात म्हणणे सादर करा – जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभाग

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
जिल्हास्तरीय आहार समिती अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील 16 ग्रामीण व 2 नागरी प्रकल्पांना घरपोच आहार व जिल्ह्यातील 16 ग्रामीण प्रकल्पासाठी गरम ताजा आहार याबाबत दि. 30 जून 2021 रोजी ई- निविदा प्रसिध्द करण्यात आली होती.
निविदेमध्ये घरपोच आहार मधील एकुण 124 प्राप्त निविदेपैकी 85 निविदा पात्र झाल्या आहेत व 39 बचत गटाच्या निविदा अपात्र झाल्या आहेत. ज्या 39 अपात्र निविदांना व गरम ताजा आहारमध्ये एकूण 26 बचत गटाच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत त्यातील 4 बचत गटाच्या निविदा पात्र झाल्या आहेत तर 22 बचत गट निविदा अपात्र झाल्या आहेत. यामध्ये अपात्र बचत गट निविदाधारकांनी सात दिवसात अपात्रतेबाबत आपले म्हणणे (काही तक्रार असल्यास) आपल्या कार्यक्षेत्रातील संबंधित बाल विकास प्रकल्प कार्यालय येथे सादर करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांनी केले आहे.