क्युआर कोड जंगल मौनीगुरुकुलचा अभिनव नवोपक्रम; मुलांचा थेट जंगल व पर्यावरण यांच्याशी सहसंबंध यावा यासाठी उपक्रमाची गुरुकुल मध्ये सुरुवात.

कडगांव प्रतिनिधी :
मठगांव ( ता भुदरगड) येथील श्रीमंत क्षात्र जगद्गुरू विद्यालय व मौनी गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने क्युआर कोड जंगल हा अध्यापनासी निगडीत उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन मौनीगुरुकुलच्या संस्थापिका श्रीमंत विद्यावहिनी बेनाडीकर यांच्या हस्ते झाले.मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये मराठी क्रमिक पुस्तकात आठवी ते दहावी वर्गासाठी सत्तावीस निसर्ग पर्यावरण संदर्भात पाठ आहेत. त्यामुळे मुलांचा थेट जंगल व पर्यावरण यांच्याशी सहसंबंध यावा. अरण्यभाषेची ओळख व्हावी, म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
या उपक्रमामध्ये शाळा परिसरातील देशी जंगली झाडांचा एक भाग घेऊन त्या झाडावर क्यु आर कोड लावण्यात आले आहेत. सदरचा क्युआर कोड स्कँनिंग केल्यास संबंधित झाडाची इत्यंभूत माहिती मोबाईल वर पाहता येते. यामध्ये झाडांचे शास्त्रीय नांव, कुळ, विदेशी नाव, संस्कृत, मराठी, कन्नड, तेलगु, हिंदी, गुजराती अशा विविध भाषेतील नावे, त्यांचे औषधी गुणधर्म अशी माहिती समोर येते. या उपक्रमात पक्ष्यांचे आवाज व त्या संदर्भात माहिती अनुभवता येते. सदरचा उपक्रम प्रसिद्ध जंगल संशोधक झुंडकार दत्ता मोरसे यांच्या प्रयत्नातून साकार झाला आहे.
या उपक्रमास संस्थेचे संस्थापक श्रीमंत संजयदादा बेनाडीकर यांचे मार्गदर्शन लाभले शाळेचे मुख्याध्यापक वाय के पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले. उद्घाटन प्रसंगी सी व्ही देसाई, एम के खोत, ए डी कांबळे, एस ए पाटील, एस एम सुर्यवंशी, विष्णू खोत, शेखर साळवी, सात्तापा हरणे हजर होते. आभार जनरल सेक्रेटरी वेदांत पोटे यांने मानले.