दगडू शेणवी युवा मंच दौलतवाडी यांचेवतीने ४०० झाडे लावण्याचा उपक्रम

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील दौलतवाडी येथील दगडू शेणवी युवा मंच दौलतवाडी यांच्यामार्फत ४०० झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.याकरता शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यात आले आहे. “एक तरी झाड लावा,” तसेच “झाडे लावा झाडे जगवा “अशा पर्यावरण पूरक घोषणांनी विद्यार्थ्यांनी झाडे लावायला सुरुवात करण्यात आली.
दौलतवाडी ग्रामपंचायतीने सुद्धा या उपक्रमास सक्रिय सहकार्य केले आहे. तसेच गावचे प्रतिष्ठित नागरिक शिवाजी मोरे यांनी ४०० झाडे या उपक्रमासाठी देऊ केली आहेत.याशिवाय गारगोटी येथील सापळे कन्स्ट्रक्शन यांनीही यासाठी सहकार्य केले आहे.
या उपक्रमात दौलतवाडीचे ग्रामसेवक विजय पाटील, सरपंच संदेश जाधव, शेखर कानडे ,उत्तम पाटील गुरुजी, कांबळे गुरुजी ,विशाल कांबळे सुरज मुसळे, दिगंबर कांबळे, मयूर जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी आनंदा आसवले, सचिन माने,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद जाधव व युवा मंचचे अनेक सदस्य यांनी या पर्यावरण पूरक उपक्रमात भाग घेतला.