सदाशिवराव मंडलिक संस्कार भवन मध्ये भरला भारतीय सणांचा मेळा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शिमग्याची होळी ,पाडव्याची गुढी, दसऱ्याच्या खंडेनवमीची शस्त्रपुजा, बेंदराची बैलपुजा, दिपावलीचे लक्ष्मीपुजन, पांडव , पाडवा , रक्षाबंधनाच्या घार्या आणि राख्या , हादग्याची खिरापत, ख्रिसमसचा येशु – सांताक्लॉज , बौद्ध पौणिमेची धम्मवंदना ‘ महावीरांचे तत्वज्ञान नागपंचमीच्या दुध – लाह्या, नागोबा , दसऱ्या नंतरचे भुमीपूजन, पारशी दिनाचे पातेती नावरस, आदि भारतीय परंपरेतील सण -वार – उत्सव एकाच वेळी साजरे झाले . ते मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक संस्कार भवनाच्या प्रांगणातील विजयमाला मंडलिक सांस्कृतिक सभागृहात .येथील चिमुकल्यांनी शाळेच्या उपक्रमाला प्रतिसाद देत सुंदर मांडणीतून , वेशभूषेतून, सणातील खाअपदार्थांच्या पुजाअर्चेच्या मांडणीतून , भारतीय परंपरेतील सण उत्सव कसे निसर्गाशी निगडीत आहेत हे सादर केले .
महिलांची अलोट पहाण्यासारखी होती भारतीय परंपरेनुसार वर्षभरामध्ये ज्या – त्या ऋतू अनुसरून सणांची रचना केलेली होती . हे सण साजरे करण्या मागिल निसर्ग,आरोग्य, विज्ञान आणि तत्वज्ञान यांचाही विचार मांडला होता . आज आधुनिक जगा मध्ये सर्व सण केवळ एन्जॉयमेंट म्हणून साजरे केले जातात या सर्वांची खरी ओळख त्यामागील विज्ञान पारंपारिक पद्धती यांचे ओळख सध्याच्या विद्यार्थ्यांना व्हावी व ही सांस्कृतिक परंपरा पुढे चालू रहावी या हेतूने संस्कार भवन मध्ये एक आगळे वेगळे प्रदर्शन भरवले गेले
या मध्ये सर्वधर्मीय विविध सण इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांनी प्रतिकृती स्वरूपात मांडले होते .
प्रदर्शनाचे उद्घाटन संस्था कार्यवाह आण्णासो थोरवत यांचे हस्ते , प्राचार्य बी आर बुगडे यांचे अध्यक्षते खाली व प्राध्यापक उदय शेटे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले .
मुख्याध्यापिका योगिनी शेटे यांनी प्रास्ताविक केले . संगिता खोत यांनी स्वागत केले .
सदरच्या प्रदर्शनात ५४ प्रकारचे विविध सणांचे छोटे मोठे मॉडेल्स विद्यार्थ्यांनी वैयक्तिक अथवा गटामध्ये सादर केले यामध्ये प्रत्येक सणांचा बारकावा अगदी नैवेद्य वाढण्याची पद्धती पूजा करण्याची पद्धती त्या पाठी मागचे शास्त्रीय कारण कोणत्या ऋतूमध्ये साजरा केला जातो याबाबतची माहिती विद्यार्थी सांगत होते तसेच चार्ट च्या स्वरूपात मांडली होती
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख वर्षा मांगले, सारिका वंदूरे ,सागर पाटील यांच्या मार्गदर्शना खाली केले गेले तर या कार्यक्रमाचे परीक्षण वृक्षमित्र प्रविण सूर्यवंशी, कलाध्यापक संदीप मुसळे यांनी केले उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुजा उगले, सारिका कणसे, भाग्यश्री गव्हाणकर, शितल भाट यांनी मोलाचे योगदान दिले .
या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनास पालक वर्ग शालेय विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले .