आरोग्यजीवनमंत्रताज्या बातम्यामहाराष्ट्र

“गुळवेल जीवनअमृत” ला वाढली मागणी; जाणून घ्या “गुळवेल जीवनअमृत” चे विविध फायदे

सद्यस्थिती मध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र विभागात(कोल्हापूर,सांगली,सातारा,सोलापूर,पुणे) वितरक(डिस्ट्रीब्यूटर/रिटेलर) नेमण्याचे काम सुरु असून कोकण विभागात देखील वितरक इच्छुकांचे संपर्क होत आहेत. तरी इच्छुक व्यक्ती/समूहांनी +९१ ९४२०५८२८६५ / +९१ ९२८४२८६८३० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महा वनौषधी  निर्मिती, संवर्धन, संशोधन, उपचार, प्रशिक्षण केंद्राकडून करण्यात आले आहे.

४५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे आयुर्वेदाचार्य श्री. नारायण डवर निसर्गोपचार केंद्र आणि महा वनौषधी  निर्मिती, संवर्धन, संशोधन, उपचार, प्रशिक्षण केंद्राद्वारे निर्मित १००% नैसर्गिक आणि आयुर्वेदिक गुळवेल जीवनअमृत ला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून ऑनलाइन मागणी वाढली आहे.

कोरोना काळात सर्वाधिक फायदेशीर ठरलेली वनस्पती तसेच आयुर्वेदातील सर्वाधिक औषधी गुणधर्म असणारी वनस्पती म्हणून गुळवेलला सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळेच गुळवेल जीवनअमृतची मागणी वाढली   असल्याचे महा वनौषधी  निर्मिती, संवर्धन, संशोधन, उपचार, प्रशिक्षण केंद्राकडून सांगण्यात आले.

सद्यस्थिती मध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र विभागात(कोल्हापूर,सांगली,सातारा,सोलापूर,पुणे) वितरक(डिस्ट्रीब्यूटर/रिटेलर) नेमण्याचे काम सुरु असून कोकण विभागात देखील वितरक इच्छुकांचे संपर्क होत आहेत. तरी इच्छुक व्यक्ती/समूहांनी +९१ ९४२०५८२८६५ / +९१ ९२८४२८६८३० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महा वनौषधी  निर्मिती, संवर्धन, संशोधन, उपचार, प्रशिक्षण केंद्राकडून करण्यात आले आहे.

गुळवेल जीवन अमृत चे विविध फायदे :

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी (Immunity System)

प्रतिकारशक्ती कमी होणे हेच मुळात आजारी पडण्याचे मुख्य कारण आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. कोणताही आजार हा प्रतिकारशक्ती कमी झाल्यावरच होतो. त्यानुसार तुम्ही गुळवेलचे सेवन करू शकता. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गुळवेल अत्यंत लाभदायी आहे असं आयुर्वेदातही सांगण्यात आले आहे. यामध्ये इम्यूनोमॉड्युलेटरी नावाचा घटक अधिक आढळतो. जो प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतो. 

क्रोनिक फिव्हर व्यवस्थित करण्यासाठी (Chronic Fever)

साधारण 10-15 दिवसांनंतरही तापाची समस्या कमी होत नसेल तर त्याला क्रोनिक फिव्हर अर्थात जुना ताप असं म्हटलं जातं. तुम्ही या समस्येवर गुळवेलाचा उपयोग करून घेऊ शकता. हा ताप काढण्यासाठी तुम्हाला गुळवेलाचा उपयोग करता येतो. यासाठी तुम्ही गुळवेलाची फळं आणि पानांचा वापर करून काढा बनवू शकता. यामध्ये असणारे अँटिपायरेटिक (ताप बरा करणारा घटक) आणि अँटिमलेरियल (मलेरिया इन्फेक्शन दूर करणारा घटक) गुण तापासून सुटका मिळवून देतात. तुम्हाला हवं तर गुळवेलाची पावडर कोमट पाण्यात मिक्स करूनही घेऊ शकता. 

पचनक्रिया चांगली करण्यासाठी (Digestive System)

सध्याच्या लाईफस्टाईलमुळे अन्न पचनाची अनेकांना समस्या असते. उशीरा जेवण आणि सतत ताण यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. गुळवेलाची औषधीय गुणांमध्ये पचनक्रियेसंबंधी समस्या दूर करण्याची गुण आहेत. डायरिया आणि जुलाब होत असतील तर त्यासाठीही हे उत्तम ठरते. पचनतंत्र मजबूत करण्यासाठी याचे साह्य मिळते. त्यामुळे तुम्हाला जुलाब होत असतील तर तुम्ही गुळवेलाचा आधार घ्या. 

मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी (Diabetes Control)

बदलत्या लाईफस्टाईलमुळे आजकाल फारच लहान वयात अनेकांना मधुमेहाच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. पण गुळवेलाच्या पावडरचे नियमित तुम्ही उपाशीपोटी पाण्यातून सेवन केल्यास, मधुमेह आटोक्यात येण्यास मदत मिळते. मधुमेहावर उत्तम घरगुती उपाय आहे. यामध्ये असणारे अँटिहायपरग्लायसेमिक (रक्तातील साखरेची पातळी कमी करणारा घटक) गुण आढळतात. यामुळेच शरीरातील इन्शुलिनची सक्रियता वाढवून साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत मिळते. मधुमेहापासून सुटका मिळविण्यासाठी हा उत्तम उपाय असल्याचे मानले जाते. 

डेंग्युवरही लाभदायक (Dengue)

गुळवेल हे औषधीय गुणांचे भंडार समजण्यात येते. यामध्ये अशी अनेक रसायने आहेत ज्यामुळे इम्यूनमॉड्युलेटरी प्रभाव अधिक जाणवतो. यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढून अनेक आजारांपासून लढण्याची ताकद मिळते. यामध्ये मलेरिया आणि डेंग्यू सारख्या आजारांचीही नावे आहेत. याचे इन्फेक्शन दूर करण्यासाठीही गुळवेलाचा वापर करता येतो. त्यामुळे डेंग्युसारख्या आजारात गुळवेल लाभदायक ठरते. याचे निमयित सेवन तुम्हाला डेंग्यूचा ताप उतरवण्याठी मदत करते. 

दम्याकरिताही ठरते उपयोगी (For Asthma)

दम्याच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठीही गुळवेल चे फायदे मिळतात. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी श्वासासंबंधी समस्या सोडविण्यासाठीही याचा उपयोग होतो. दम्याची लक्षणे कमी करण्याची प्रबळ क्षमता गुळवेलामध्ये आहे. त्यासाठी तुम्ही याचा रस मधासह मिक्स करून सेवन करा. त्यामुळे दम्याचा त्रास कमी होण्यास मदत मिळेल.

सूज असल्यास उपायकारक (For Swollen Problem)

विशेषतज्ज्ञांच्या माहितीनुसार, गुळवेलामध्ये अँटि इन्फ्लेमेटरी (सूज कमी करणारे), अँटिअर्थरायटिक (सांध्याची सूज कमी करणारे घटक) आणि अँटिऑस्टियोपोरोटिक (सांध्याचे दुखणे आणि सूज कमी करणारे घटक) असे गुण आढळतात. या तिन्ही गोष्टी कमी करण्यासाठी गुळवेलाचा फायदा मिळतो. त्यामुळे तुम्ही गुळवेलाचे कशाही स्वरूपात सेवन केल्यास तुम्हाला त्याचा शरीरावर सूज असल्यास, फायदा मिळतो. तुम्ही यापासून सुटका मिळविण्यासाठी नियमित स्वरूपात याचे सेवन करू शकता. मात्र याचे योग्य प्रमाण डॉक्टरांना विचारून घ्यावे. 

डोळ्यांच्या समस्येसाठी (For Eyes Problem)

डोळ्यांच्या समस्येवरही गुळवेल गुणकारी ठरते. विशेषतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये असणारे इम्यनोमॉड्युलेटरी गुण हे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात. डोळ्यांची जळजळ, डोळे लाल होणे अथवा डोळ्यांना सूज येणे अशा समस्यांसाठी तुम्ही गुळवेल पावडर रोज पाण्यातून सेवन केली तर त्यातून सुटका मिळण्यास मदत मिळते. योग्य प्रमाणात तुम्ही रोज याचे सेवन करावे. 

चमकदार त्वचेसाठीही प्रभावी (To Maintain Good Skin)

अनेक रासायनिक तत्वांच्या उपलब्धतेमुळे गुळवेलात अँटिएजिंग घटक आढळतात. त्यामुळे शरीरातील आजार दूर करण्यासह वाढत्या वयाचा त्वचेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. याचे संतुलित प्रमाणात तुम्ही नियमित सेवन केले तर तुमची त्वचा अधिक चमकदार राखण्यास आणि त्वचेवर सुरकुत्या न येऊ देण्यासाठी याचा उपयोग होतो. 

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks