ताज्या बातम्यामहाराष्ट्र
बेलवळे खुर्द येथे वॉटर एटीएमचे उदघाटन

बिद्री प्रतिनिधी :
बेलवळे खुर्द ( ता. कागल ) येथे व्हरबॅक या औषध कंपनीने सुमारे सहा लाख रुपये खर्चुन उभारलेल्या वॉटर एटीएमचे उदघाटन कंपनीचे बिझनेस मॅनेजर रवींद्र दशकत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मयुर महाजन, विकास नाईक,माजी सरपंच दिनकर कोतेकर, सरपंच रेश्मा पाटील, उपसरपंच धनाजी कांबळे ग्रामसेवक ज्ञानदेव पाटील, ज्ञानदेव जाधव, अशोक पाटील, संभाजी पाटील, विनायक वाईंगडे, काका पाटील, संजय पाटील, शहाजी पाटील, मारुती जाधव, युवराज पाटील, मारुती पाटील, महादजी पाटील ,वसंत पाटील, के.पी.पाटील, सतीश वाईंगडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार ग्रा. प. सदस्य युवराज वाईंगडे यांनी मानले.