ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेणगांव येथे जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांच्या फंडातून उभारण्यात आलेल्या खुल्या मंडप सभागृहाचे उद्घाटन संपन्न; पुढील चार दिवसात उर्वरित विकास कामांना गती देणार : जीवन पाटील यांनी दिला शेणगांव वासियांना शब्द

गारगोटी  : 

मी शब्द दिल्याप्रमाणे शेणगांव जिल्हा परिषद मतदार संघाला भरीव स्वरुपाचा निधी दिला असून एकही गांव विकासापासून वंचित ठेवले नाही. या करोडोंच्या निधीमूळे लाखो लोकांच्या ह्रदयात मी मानाचे स्थान निर्माण केले आहे. विकासकामांचा हा सिलसिला यापुढेही सुरु ठेवणार असल्याचे आश्वासन शेणगांव आकुर्डे जिल्हा परिषद मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी दिले.

जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी आपल्या जिल्हा परिषद निधीतून रू २ लाख रक्कम येथील पुरातन हेमाडपंथी मंदिराच्या खूल्या प्रसादगृहासाठी दिली.

या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आज बुधवार दिनांक २ मार्च २०२२रोजी सकाळी ११-०० वा आयोजित केलेल्या या विकास कामंच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेणगांवचे लोकनियुक्त सरपंच सुरेशराव नाईक हे होते.

यावेळी बोलताना भाजपचे जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील म्हणाले की, ‘ जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी या त्यांच्या जिल्हा परिषद मतदार संघाला कित्येक कोटीचा प्रचंड मोठा निधी देवून आपले कर्तृत्व व दातृत्व सिध्द केले आहे.

यावेळी बोलताना शेणगांवचे लोकनियुक्त सरपंच सुरेशराव नाईक म्हणाले की, जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी कोणताही गट तट,पक्षभेद न मानता सर्व समाजाला विकासकामांचे मोठे योगदान दिले आहे.दिला शब्द ते कधी मोडत नाहीत.मंत्री गण व नेत्यांच्या माध्यमातून त्यांनी कित्येक कोटींचा निधी खेचून आणला आहे.अशा कर्तव्यदक्ष जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांना कधीही आंम्हास विसरता येणार नाही.

आज महाशिवरात्रीचा दिवस असल्याने या स्थळाला यात्रेच्या निमित्ताने येथील तेली समाज व सणगर समाज यांनी भोजन महाप्रसादाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे केले.या महाप्रसादाचा शुभारंभही पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला.जि प सदस्य जीवन पाटील यांनी दुसऱ्या बाजूच्या प्रसादग्रहालाही निधी देण्याचे आश्वासन दिले.पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपचे सुनिल तेली, डॉ.डी ए कुंभार, मेजर गोपाळ आक्काप्पा कुंभार, बाळासो तेली, ग्रामपंचायत सदस्य भैरवनाथ कुंभार, अवधूत विभूते, बाळासो मेणसे, संतोष सिद्धप्पा तेली, रणवीर कुंभार, नंदकुमार वायचळ, विलास सणगर, दत्तात्रय तेली, अशोक स्वामी सर, पत्रकार सुभाष माने, नामदेव येडूरे, लिंगायत व सणगर समाजबांधव, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या.

सुत्रसंचालन व आभार निकाल न्यूजचे संपादक मंगेश कोरे यांनी मानले.

सुनिल तेली यांच्या पाठपुराव्यामुळेच हा मंडप जलदगतीने उभारला…

जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी आपल्या भाषणात बोलताना, शेणगांव चे युवक नेते सुनिल तेली यांनी वेळोवेळी आपल्याकडे पाठपुरावा केल्यामुळे या खुल्या सभामंडपाची उभारणी याठिकाणी जलदगतीने झाली असल्याचे सांगितले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks