ताज्या बातम्यामहाराष्ट्र
पाळेवाडी येथे जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांच्या हस्ते ११ लाखांच्या विकास कामाचे उद्घाटन.

गारगोटी प्रतिनिधी :
पाळेवाडी (ता. भुदरगड) येथे जीवन दादा पाटील यांच्या जि. प. फंडातून ११ लाखाच्या विकास कामाचे रस्त्याचे व पिकप शेडचे उद्घाटन जि. प. सदस्य जीवन दादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी ग्रा. प. सदस्य धनाजी गुरव, भगवान देसाई, बाळू गुरव, सरपंच दिनकर गुरव, एम डी पाटील सो, मुरलिधर देसाई, बाबुराव देसाई, पांडुरंग देसाई, सचिन देसाई, रवी शिर्सेकर, नामदेव देसाई, प्रकाश देसाई, आनंद देसाई, रमेश देसाई, संदीप देसाई, साताप्पा कांबळे, महेश देसाई, प्रेम कांबळे, भोमकरवाडी चे युवा नेते शरद झगडे, रंगराव देसाई, स्वप्नील फराकटे, युवक व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक महेश देसाई यांनी केले. आभार बाळू गुरव यांनी मानले.