रविवारी होणार गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा; राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या शुभहस्ते होणार सोहळा संपन्न.
सदर कार्यक्रमाला राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची अध्यक्षीय उपस्थिती असणार आहे. तसेच विशेष अतिथी म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे उपस्थित असणार आहेत.

गारगोटी प्रतिनिधी :
गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गारगोटी व गारगोटी परिसरातील नागरिकांना नवीन इमारत रुग्णसेवेसाठी खुली होणार आहे. रविवार दि. २४ रोजी सकाळी ११.०० वा. उपजिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
गारगोटी रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यानंतर या इमारतीचे बांधकाम सुरू झाले होते. ही इमारत मंजूर झाल्यानंतर विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई चालू होती. त्यामुळे या इमारतीचे बांधकाम कधी पूर्ण होणार…याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून होते. नवीन वर्षामध्ये अत्याधुनिक उपकरणायुक्त नवीन इमारतीमध्ये रुग्णालय सुरू होत असल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
सदर कार्यक्रमाला राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची अध्यक्षीय उपस्थिती असणार आहे. तसेच विशेष अतिथी म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे उपस्थित असणार आहेत.
कार्यक्रमासाठी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, लोकसभा खासदार संजय मंडलिक, लोकसभा खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, अरुण लाड, जयंत आसगावकर, विनय कोरे, प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, पी एन पाटील, राजेश पाटील, राजू आवळे, ऋतुराज पाटील, श्रीमती जयश्री जाधव यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा तथा अभियानचे आयुक्त धीरज कुमार, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, आरोग्यसेवा आयुक्तालयाचे सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड, आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड, कोल्हापूरचे सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. पी. कुंभार, सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिणचे कार्यकारी अभियंता प्र. र. जाधव यांची विशेष उपस्थिती असणार आहे.