ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बिंदू चौक कँडल मार्च काढून मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी बांधवांना आदरांजली

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील क्रूर शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बिंदू चौक कँडल मार्च काढून मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी बांधवांना आदरांजली वाहण्यात आली.
या क्रूर घटनेच्या निषेधार्थ व आरोपींना पाठीशी घालणा-या भाजप सरकारविरोधात महाविकास आघाडी सरकारने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आपणही मोठ्या संख्येने सहभागी होऊन बंद यशस्वी करूया असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले.