ताज्या बातम्यामहाराष्ट्र

करवीर तालुक्यात महापुरात बुडालेल्या पिकांना नुकसानभरपाई न मिळाल्यास आंदोलन छेडू : नामदेवराव  गावडे यांचा इशारा 

सावरवाडी प्रतिनिधी :

सन२०१९साला पेक्षा यंदा महापुराची व्याप्ती मोठी होती . करवीर तालुक्यात महापुरात बुडालेल्या नद्यांच्या काठावरील शेती पिकांची निपक्ष पहाणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस नामदेवराव गावडे यांनी दिला.

यंदा महापुराची व्याप्ती मोठी होती . भोगावती , तुळशी , कुंभी, पंचगंगा नद्यांच्या परिसरातील हजारो एकर शेतीमधील ऊस, भात , सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगामात महापुरामुळे शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसलेला आहे.

नदी काठच्या शेतकऱ्यांच्या शेतीची प्रत्यक्षात निपक्षपणे तहशिलदार, मंडल आधिकरी  प्राधिकारी, तलाठी, सर्कल यांनी पंहाणी करून तातडीने पंचनामे करावेत तसेच  शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी . शेतकऱ्यांच्यावर अन्याय झाल्यास  आंदोलन उग्र करणार असल्याचे सांगून गावडे म्हणाले पुरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य व केंद्र  शासनाने भरीव मदत करावी. 

सन २०१९ साली झालेल्या महापुराचे पैसे कांही शेतकऱ्यांना मिळाले नाही त्यांची चौकशी व्हावी या ही मागणी विचारविनीमय होणे गरजेचे आहे . नदी काठच्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पहाणी करुन अहवाल सादर करावा. 

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks