कागलच्या कुरुक्षेत्रात आमची वाटचाल विकासाच्या मुद्द्यावरच राहील : राजे समर्जीतसिंह घाटगे; तरुणाना स्वावलंबी बनवणार; नोकऱ्या देणारे देणारे तरुण निर्माण करणार.

कागल प्रतिनिधी :
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे आदर्श कागल उभारण्याचे स्वप्न स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांनी पाहिले होते. माझाही तोच प्रयत्न आहे. कागलच्या कुरुक्षेत्रात आपणास आमची वाटचाल विकासाच्या मुद्द्यावरच राहील.आजचे तरुण स्वावलंबी झाले पाहिजेत,नोकऱ्या मागणाऱ्या तरुणापेक्षा नोकऱ्या देणारे देणारे तरुण निर्माण झाले पाहिजेत यासाठी मला सर्वांची साथ लागेल.असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
ते पुढे म्हणाले,यापुढे तरुणांना राजे बँकेच्या माध्यमातून व्यवसायिक कर्जाच्या स्वरूपात आर्थिक पाठबळ देऊन व त्यासाठीचे प्रशिक्षण देऊन छोटे मोठे उद्योजक निर्माण करावयाचे आहेत. स्थानिक उद्योग धंद्यांचे प्रशिक्षण देणेसाठी पुण्यातील सारथी संस्थेबरोबर आपण टाय-अप केले आहे.त्याअनुषंगाने पुण्यातील दलित संघटना,(डिकी),सारथी,राजे बँक आणि शाहु साखर कारखाना या सर्वांना एका छताखाली आणून सुरक्षित कागल,आदर्श कागल,बनवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.
स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी कागल तालुक्यामध्ये समाजकारण व सुसंस्कृत राजकारण केले. मात्र काही जणांनी त्यांची थट्टा केली .मात्र राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श समोर ठेवून करीत असलेल्या त्यांच्या या कार्यपद्धतीचा मला अभिमान आहे.तोच वारसा मी पुढे चालवीत आहे. कागल तालुक्यातील युवकांना मला स्वतःच्या पायावर उभे करायचे आहे.त्यांना कोणाच्या दारात जायला लागू नये इतके सक्षम व स्वावलंबी करायचे आहे.
आज,खरच! कागलची वाटचाल आदर्श कागल च्या दृष्टीने सुरू आहे का? हा प्रश्न पुढे येत आहे.त्यामुळे कागल तालुक्याची पाठराखण करण्याची आणि कागल तालुका सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आता युवा पिढीवर आहे.त्यासाठी मी तरुणांचे बरोबर कायमपणे राहणार आहे.
हा राजकिय कार्यक्रम नाही तरीही तरीही त्यावर मिस्कील भाष्य करताना ते म्हणाले ,मी वारंवार दिल्लीला जात असल्यामुळे माझ्या खासदारकी बाबत काही जण चर्चा करीत आहेत. मी दिल्लीला जातो यासाठीच केंद्र सरकारच्या अनेक योजना लोककल्याणकारी आहेत त्या आणण्यासाठी. मात्र आमदारकी जिंकल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही.अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली. त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्तपणे दाद दिली.
बिद्री साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब पाटील म्हणाले, गुणवत्तापूर्ण काम हीच राजे गटाची ओळख आहे. सातत्याने चांगले काम करीत राहिल्यावर यश मिळाल्याशिवाय रहात नाही.
गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील म्हणाले, अगदी कमी कालावधीमध्ये समरजितसिंह घाटगे यांनी स्व. विक्रमसिंहजी घाटगे यांचा नावलौकिक वाढविला आहे. गेल्या दोन वर्षाच्या अडचणीच्या काळात ही त्यांनी तरुण व समाजाला आधार देण्याचे काम केले आहे. त्यांच्यात जशास तसे उत्तर देण्याची धमक आहे.भविष्य ते आमदार तर होतीलच पण मंत्री सुद्धा होतील. त्यांची कामाची पद्धत पाहता राज्याच्या राजकारणात ते निश्चितच पुढे जातील. असे नेतृत्व आपण वाढवूया.
यावेळी डॉ.प्रियांका शिंगे,तायक्वांदोपटू अमृता परीट,अमेय पाटील,स्नेहल पाटील,राजननंदिनी पाटील,तन्वी कांबळे,कल्याणी पाटील या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.राजे बँकेअंतर्गत शाखांसाठीच्या स्पर्धेतील अनुक्रमे पहिल्या तीन क्रमाक विजेत्या बाचणी,गडहिंग्लज व लक्ष्मीपुरी शाखेस व ळृकर्मचाऱ्यांसाठींचा आदर्श कर्मचारी पुरस्कार अमित चांदेकर यांना प्रदान केला.
यावेळी बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र जाधव नगरसेवक विशाल पाटील,विश्वास तोडकर (लिंगनुर) ,अनिल पाटील (साके),ओंकार अस्वले,अविनाश कांबळे (कागल),स्मिता गंगापुरे (उजळाईवाडी) यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी समरजितसिंह घाटगे यांचा राजे बँकेमार्फत मराठा समाजातील तरूणांना राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे ४० कोटी रूपयांचे कर्ज वाटप केल्याबद्दल सकल मराठा समाजातर्फे व इतर समाजातील तरूणांसाठी नवीन कर्ज योजना राबविल्याबद्दल बहूजन समाजातील तरूणांतर्फे सत्कार केला.
व्यासपीठावर शाहू चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, वीरेंद्रसिंह घाटगे, भुषण पाटील, बाबगोंडा पाटील, राजे बँकेचे सर्व संचालक, शाहू ग्रुपचे संचालक, आदी मान्यवर उपस्थित होते
स्वागत राजे बँकेचे चेअरमन एम .पी.पाटील यांनी केले.आभार उपाध्यक्ष नंदकुमार माळकर यांनी मानले.
एमआयडीसीत समन्वय कक्ष दोन दिवस उपस्थिती
यावेळी श्री. घाटगे यांनी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत लक्ष्मी टेकडीजवळ उड्डाण पूलास केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडून मंजुरी आणल्याबद्दल उद्योजक व कर्मचार्यांच्या वतीने माझा सत्कार केला .त्यावेळी त्यांनी मला विविध अडचणी सांगितल्या. या अडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असून त्याठिकाणी समन्वय केंद्राच्या माध्यमातून महिन्यातून दोन दिवस उपस्थित राहणार आहे. असेही स्पष्ट केले.
फटाक्यांची माळ .. सुरक्षिता…आणि पाठबळ
श्री घाटगे कार्यक्रम स्थळी येताच उत्साही तरुणांनी फटाक्यांची माळ लावली.तर काहींनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी सभोवार कडे केले .आपल्या भाषणात याचा संदर्भ घेत तरुणांना उद्देशून श्री घाटगे म्हणाले,सुरक्षितता जपायची असेल,कागल ची जपा.पाठबळ द्यावयाचे असेल तर मला नको आदर्श कागल घडवण्यासाठी द्या.