ताज्या बातम्या
दूधसाखर महाविद्यालय बिद्री ची विद्यार्थिनी प्राची चौगले मराठी विषयात विद्यापीठात प्रथम

बिद्री /प्रतिनिधी : (अक्षय घोडके)
बिद्री येथील दूधसाखर महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्राची बंडेराव चौगले ही शिवाजी विद्यापीठाच्यावतीने मार्च/एप्रिल २०२३ मध्ये घेतलेल्या परीक्षेत मराठी विषयामध्ये विद्यापीठात गुणानुक्रमे प्रथम आली आहे. तिला विद्यापीठाच्यावतीने प्रथम क्रमांकासाठी देण्यात येणारी प्राचार्य एस.के ऊर्फ बापूसाहेब उणूने तसेच डॉ. विष्णू बाळकृष्ण ऊर्फ मधू कुलकर्णी यांचा नावे देण्यात येणारी पारितोषिकेही मिळाली आहेत. तिला संस्थाध्यक्ष मा.के. पी. पाटील व सर्व संचालक मंडळ तसेच सचिव मा.एस.जी.किल्लेदार यांचे प्रोत्साहन व प्राचार्य डॉ.संजय पाटील, प्रा. डॉ. आनंद वारके व डॉ.प्रदीप कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.