ताज्या बातम्याभारतमहाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ दोन जिल्ह्यांमध्ये तातडीने संपुर्ण लॉकडाऊन जाहीर करा : केंद्रीय टीम

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे 

सध्या सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. आता कुठं महाराष्ट्र राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या कमी होत आहे. परंतु राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही परिस्थिती आटोक्यात आली नसल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय टीमने पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

केंद्रीय टीमने नुकताच कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये जाऊन, त्या ठिकाणची कोरोना परिस्थिती नेमकी कशी आहे याची पाहणी केली आहे. त्या पाहणीवरून केंद्रीय टीमने कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांमधील वाढत्या कोरोनाच्या संख्येवरून चिंता व्यक्त केली आहे. केंद्रीय टीमने सर्व परिस्थितीचा अभ्यास करत राज्य सरकारला या दोन्ही जिल्ह्यांत संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा महत्वपूर्ण सल्लाही दिला आहे.

महाराष्ट्रात 10 जिल्हे असे आहेत की, त्याठिकाणी कोरोना पॉझिटीव्ह रेट खूपच जास्त आहे. त्यावरून केंद्रीय टीमने या जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचा दौरा केला. त्या जिल्ह्यांमध्ये जाऊन कोरोना टेस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट टेस्टिंग आणि त्याचबरोबर कोरोनाप्रतिबंधक लसीकरण वाढवण्याचा सल्लाही केंद्रीय टीमने दिला असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे महाराष्ट्राला यावेळी कोरोनाप्रतिबंधक लसींचा अधिक पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी मी करणार आहे. त्यासाठी मी लवकरच दिल्लीला जाणार असल्याचंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशातील काही भागात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं दिसून येत आहे, तर दुसरीकडे तज्ज्ञांकडून कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. त्यामुळे अजुनही कोरोना रोगाचं संकट टळलं नसल्याचं सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. प्रत्येकानं सर्व कोरोना नियमांचे पालन करणं गरजेचं आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks