ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय लोक आदालतीला उस्फुर्त प्रतिसाद

कोल्हापूर :

मा.महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे आदेशानुसार आणि मा.व्ही.व्ही.जोशी यांचे मार्गदर्शनाखाली आज ११ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय लोक आदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी १०: वाजता मा.व्ही.व्ही.जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे हस्ते आणि मा.श्री.गिरीश खडके, अध्यक्ष, जिल्हा बार असोसिएशन,मा.बी.डी.शेळके, जिल्हा न्यायाधीश-२, कोल्हापूर आणि मा.श्री.खरादी, मुख्यन्यायदंडाधिकारी, कोल्हापूर आणि विशेष म्हणजे एका अपघाताने मयत झालेल्या वारसदार यांचेही हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी न्यायिक अधिकारी,बार असोसिएशन चे सर्व पदाधिकारी, विधीज्ञ,पक्षकार उपस्थित होते.

या मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील औदयोगिक न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय आणि शाळा न्यायाधिकरण येथे आभासी तंत्रज्ञान व प्रत्यक्षरित्या राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करणेत आले.

जिल्हा व सत्र न्यायालय, कोल्हापूर तसेच सर्व तालुका न्यायालय कळे खेरीवडे, मलकापूर , पन्हाळा , कागल , कुरुंदवाड , इचलकरंजी , आजरा , चंदगड , गडहिंगलज , जयसिंगपूर , पेठवडगाव , राधानगरी येथे आयोजीत राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजित करण्यात आले होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks