ताज्या बातम्यामहाराष्ट्र
‘आपले सरकार सेवा केंद्रा’बाबत तक्रार असल्यास उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांच्याशी संपर्क साधा : उपजिल्हाधिकारी

कोल्हापूर प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या अंतर्गत तहसिल कार्यालय स्तरावर ‘आपले सरकार सेवा केंद्र’ कार्यान्वित आहेत. याची गावनिहाय यादी जिल्हयाच्या www.kolhapur.gov.in या संकेतस्थळावरही कायमस्वरुपी उपलब्ध करण्यात आली आहे. यादीमधील आपले सरकार केंद्राबाबत कोणाची कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास त्यांनी या संबंधित उपविभागीय अधिकारी किंवा तालुका स्तरावर तहसिलदार कार्यालय यांच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी केले आहे.