ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय
ई पीक पाहणी केली नाही तर नुकसान भरपाई मिळणार नाही, हा कुठला न्याय? राज्यमंत्री बच्चू कडू यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

अमरावती :
ई पीक पाहणी केली नाही तर नुकसान भरपाई मिळणार नाही हा कुठला न्याय? असे म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे.
ई-पीक पाहणीच्या अंमलबजावणीकरिता शेतकऱ्यांवर सक्ती करू नये, अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रातून केली आहे. यावेळी एबीपी माझाला बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ई पीक पाहणी केली नाही तर नुकसान भरपाई मिळणार नाही हा कुठला न्याय आहे. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांना भेटणार असल्याचंही राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.