ताज्या बातम्यामहाराष्ट्र

इचलकरंजी : वीजमीटरमध्ये छेडछाड करून १२ लाख रूपयांची वीजचोरी प्रकरणी दोन ग्राहकांवर गुन्हा दाखल; कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई

महावितरणच्या कोल्हापूर येथील भरारी पथकाने ही कारवाई केली. महावितरणच्या भरारी पथकाने चंदुर रोड, इचलकरंजी येथील यंत्रमाग वीजजोडणीधारक ग्राहक महावीर मगदूम व वीज वापरदार ज्ञानेश्वर आमने यांच्या चीज मीटरची पंचासमक्ष तपासणी केली. सदर तपासणीत वीजमीटरमध्ये रिडींग दिसू नये या हेतूने मीटरच्या वरील बाजूस छिद्रे पाडून डिस्प्ले बंद केल्याचे निदर्शनास आले.

इचलकरंजी :

येथील दोन यंत्रमाग वीजजोडणीधारक ग्राहकांनी वीज मीटरमध्ये वीज वापराचे रिडींग दिसू नये. या हेतूने वीजमीटरच्या वरील बाजूस छिद्रे पाडून मीटर डिस्प्ले बंद केला आहे. या ग्राहकांविरूध्द वीजमीटरमध्ये छेडछाड करून १२ लाख रूपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी जुना राजवाडा, कोल्हापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे.

महावितरणच्या कोल्हापूर येथील भरारी पथकाने ही कारवाई केली. महावितरणच्या भरारी पथकाने चंदुर रोड, इचलकरंजी येथील यंत्रमाग वीजजोडणीधारक ग्राहक महावीर मगदूम व वीज वापरदार ज्ञानेश्वर आमने यांच्या चीज मीटरची पंचासमक्ष तपासणी केली. सदर तपासणीत वीजमीटरमध्ये रिडींग दिसू नये या हेतूने मीटरच्या वरील बाजूस छिद्रे पाडून डिस्प्ले बंद केल्याचे निदर्शनास आले.

वीज चोरीच्या उद्देशाने वीजमीटरमध्ये (electric meter) छेडछाड केली. सदर वीजचोरीचा कालावधी १२ महिने इतका निर्धारीत करून या कालावधीत ३५ हजार ३२३ युनिटची वीजचोरी करण्यात आली आहे. त्याची रक्कम ५ लाख ४० हजार २२९ रूपये व तडजोड रक्कम रूपये १ लाख ५० हजार इतकी आहे.

चंदुर रोड, इचलकरंजी येथील यंत्रमाग बीजजोडणीधारक ग्राहक श्रीमती संजीवनी मगदूम व वीज वापरदार ज्ञानेश्वर आमने यांनी वीज मीटरमध्ये उपरोक्तप्रमाणेच छेडछाड केल्याचे निदर्शनास आले. सदर वीजचोरीचा कालावधी १२ महिने इतका निर्धारीत करून या कालावधीत ४३ हजार ८५६ युनिटची बीजचोरी करण्यात आली आहे. त्याची रक्कम ६ लाख ६६ हजार ५६२ रूपये व तडजोड रक्कम रुपये १ लाख ९० हजार इतकी आहे.

दोन्ही ग्राहकांना वीजचोरी व दंडाचे बिल दिलेले आहे. सदर वीजचोरी प्रकरणी महावितरणच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर भरारी पथकाचे राकेश मगर, नितीन जोशी, श्रीमती वर्षा जाधव व राजेंद्र कोरबी यांनी सहभाग घेऊन ही मोहिम यशस्वी केली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks