ताज्या बातम्या

गावच्या विकासासाठी गटातटाचे राजकरण विसरून एकत्र येणे गरजेचे : अमर पाटील यांचे प्रतिपादन

सावरवाडी प्रतिनिधी  :

शासनाच्या विविध योजना , आर्थिक फंड गावपातळीपर्यत पोहणे गरजेचे आहे . गावच्या विकासासाठी गटातटाचे राजकारण निसरून एकत्र येणे गरजेचे आहे . असे मत कॉग्रेस नेते अमर पाटील केले

करवीर तालुक्यातील कसबा बीड येथे जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण समितीच्या सभापती सारिका पाटील यांनी आपल्या फंडातुन तेरा लाख रुपयांच्या पशुवैद्यकिय दवाखाना व आरोग्य केंद्र परिसरातील विविध विकास कामांच्या आयोजित शुभारंभ प्रसंगी पाटील बोलत होते . अध्यक्षस्थानी सरपंच सर्जेराव तिबीले होते .

यावेळी बोलतांना करवीर पस चे विद्यमान सदस्य व कॉग्रेस नेते राजेंद्र सुर्यवंशी म्हणाले  कसबा बीड गावाचा विकासात्मक चेहरा बदलण्यासाठी शासनाचा फंड गावपातळीपर्यत पोहचविण्यात कसुर होणार नाही . एकदिलाने विकासकामे करण्यासाठी ग्रामस्थांची एकजूठ हवी

प्रारंभी विविध मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला . यावेळी कार्यक्रम प्रसंगी  सरपंच सर्जेराव तिबीले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कॉग्रेस नेते शामराव सुर्यवंशी गोकूळचे माजी संचालक व कॉग्रेस नेते सत्यजीत पाटील , शेतकरी नेते मुकुंद पाटील ,कुंभी कासारीचे संचालक उत्तमराव वरुटे , उपसरपंच वैशाली सुर्यवंशी , आदिची भाषणे झाली . प्रारंभी डीएम सुर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले शेवटी ग्रामसेवक संदीप पाटील यांनी आभार मानले

कार्यक्रमास कुंभी कासारी बँकेचे संचालक पंडीत वरुटे , यशवंत बँकेचे संचालक भगवान सुर्यवंशी, आत्माराम वरुटे , दिनकर गावडे ,वैशाली पाटील युवक कॉग्रेसचे प्रकाशराव तिबीले , उद्योगपती सर्जेराव सुर्यवंशी , ग्राम पंचायत  कर्मचारी सुनिल देसाई ,एकनाथ कुंभार , अविनाश चव्हाण . पांडूरंग तावडे बाळू ठाणेकर आदि उपस्थितीत होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks