पत्रकारांच्यामूळे मला जनतेचे पाठबळ मिळत आले : जि. प. सदस्य जीवन पाटील यांनी गारगोटी पत्रकार परिषदेत व्यक्त केले मत

गारगोटी प्रतिनिधी :
पत्रकारांनी नेहमी प्रामाणिकपणे माझ्या कार्याची सविस्तर माहिती जनतेपर्यंत पोहोचवली आणि म्हणूनच मला जनतेचे चांगले पाठबळ मिळत राहीले.मला जनतेसाठी अधिक काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा सतत मिळत राहीली याचे सारे श्रेय पत्रकारांना जाते असे प्रतिपादन आकूर्डे-कूर जिल्हा परिषद मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी केले.ते गारगोटी येथील एस के फॉर्महाऊस येथे आयोजित केलेल्या पत्रकारांशी आयोजित केलेल्या संवाद चर्चेदरम्यान बोलत होते.
जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील पुढे म्हणाले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब आहे याची सतत जाणीव मला होत राहाते.आम्ही जनतेसाठी केलेली कामे सर्व थरापर्यंत पोहाचवण्याचे माध्यम पत्रकाराईतके चांगले कोणतेही नाही. भुदरगड तालुक्यातील सर्व पत्रकारांनी समाजाच्या तळागाळापर्य पोहोचून विकास कामांची चांगली जागृती तर केलीच शिवाय जे चांगले आहे ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे.समाजातील वास्तवता चांगल्या पध्दतने मांडून जनतेत जनजागृती करणऱ्या या पत्रकार घटकांबध्दल मला नेहमी आदर आहे.पत्रकारांच्या हितासाठी जे मला करता येणे शक्य आहे ते ते मी येणाऱ्या काळात करत राहीन असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी या प्रसंगी पत्रकारांशी चर्चा करताना व्यक्त केला.
सुरुवातीला पत्रकार सुभाष माने यांनी आपल्या प्रास्तविकात जीवन पाटील यांची कार्यपध्दती विषद केली.जनतेबध्दल ते करत असलेल्या कार्याचा त्यांनी गौरव केला.संपर्कप्रमुख बी के कवडे यांनी जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी पत्रकारांशी सलोखा ठेवून जी विकासाची कार्यप्रणाली राबवली आहे त्याबध्दल त्यांचे स्वागत केले. कोल्हापूर जिल्हा डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स असोशियशनचे भुदरगड तालुका सचिव नामदेव पाटील यांनी आभार मानले.यावेळी पत्रकार सुनिल खोत, प्रकाश सांडुगडे, प्रकाश खतकर,सहदेव साळोखे, अजित यादव, विक्रम केंजळेकर, रविंद्र खेतल, रवि देसाई, नितिन बोटे, मंगेश कोरे, संदिप दळवी, एकनाथ कांबळे, धनाजी देसाई, प्रसाद चौगले आदी उपस्थित होते.