मला महाराष्ट्र ओळखतो मी आयुष्यात कधीच बेईमानी केली नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
राजकीय वर्तुळात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. यात जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं देखील नाव समोर आलं आहे. यावरुन आता अजित पवारांनी आक्रमक भूमिका घेत उद्या 22 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद बोलवली आहे.
उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत कुठला साखर कारखाना कुणाच्या कारकिर्दीत आणि किती रुपयांना विकला गेला याची सविस्तर माहिती देणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे. तसेच आपल्या परिवाराची जाणीवपुर्वक बदनामी करण्यात आली असल्याची खंत देखील अजित पवारांनी व्यक्त केली आहे. अनेक शेतकरी, राजकीय नेत्यांनी कारखाने विकत घेतले मात्र त्यांच्याबद्दल बोललं जात नसून फक्त माझ्या नातेवाईकांबद्दल बोललं जात आहे, असं पवारांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना महाराष्ट्रात काय जरंडेश्वर साखर कारखाना एकटाच विकला गेला नसून माझ्याकडे सर्व रेकाॅर्ड असल्याचं पवारांनी सांगितलं. मात्र याची माहिती मला उद्या पत्रकार परिषद घेऊन देयची आहे, असं देखील ते पुढे म्हणाले. तसेच उभा महाराष्ट्र मला ओळखतो मी आयुष्यात कधीच बेईमानी केली नाही, असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
दरम्यान, विकण्यात आलेल्या कारखान्यांची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल असं म्हणत काही कारखाने तीन, साडे तीन ते 18 कोटींपर्यंत विकले गेल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. यावेळी अजित पवारांनी त्यांच्या बहिणींच्या घरी इन्कम टॅक्सने धाड टाकलेल्याचा देखील उल्लेख केला आहे.