वडिलांचे स्वप्न सत्यात उतरताना पाहताना आनंद होतोय : देवराज बारदेस्कर; गारगोटी येथे एम.के.बी. हॉस्पिटलचे उद्घाटन; सर्व पक्षीय नेत्यांची हजेरी

गारगोटी :
“वडिलांना गोरगरीब व गरजू रुग्णांवर स्वस्त दरात ईलाज व औषधोपचार होण्यासाठी एक सुसज्ज हॉस्पिटल असाव असे वाटत होते. भविष्यात ते उभारण्याचा त्यांचा इरादा देखील होता, पण त्याच्या अकाली निधनामुळे हे स्वप्न शक्य होऊ शकले नाही. परंतु आज ‘मनवेल किस्तोबा बारदेस्कर म्हणजेच एम.के.बी. हॉस्पिटल’ ची उभारणी करून त्यांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद आहे, असे मत बारदेस्कर शैक्षणिक संकुलाचे सर्वेसर्वा देवराज बारदेस्कर यांनी मांडले. ते गारगोटी येथे एम. के. बी. हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुदरगड पंचायत समितीच्या पहिल्या महिला सभापती अनामारी बारदेस्कर होत्या.
प्रास्ताविक भाषणात बोलताना देवराज बारदेस्कर यांनी संस्थेच्या कार्याचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला. समाजसेवेचे व्रत घेऊन आपली वाटचाल आहे. हे हॉस्पिटल उभारण्यापाठीमागे कोणताही आर्थिक स्त्रोत उभा करणे हा उद्देश नसून परिसरातील लोकांना व रुग्णांना कमी दरात रुग्णसेवा उपलब्ध व्हावी, हा उद्देश आहे, असे ते म्हणाले.
तत्पूर्वी, आयोजित कार्यक्रमाला उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार बुके देऊन करण्यात आला.
यावेळी दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि माजी आमदार के. पी. पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन आबिटकर यांनी मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमाला माजी आमदार बजरंग देसाई, बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक के. जी. नांदेकर, बाबा नांदेकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, अजित चौगुले, प्रकाश वास्कर, सोळसे सर, जे बी बारस्कर, डॉक्टर गोडद, अशोक भांदीगरे, अमर पाटील, जयवंत चोरगे, बजरंग कोरडे, आनंदराव शिंदे, युवराज पाटील, आकाश पाटील, संस्थेचे कार्यकारी संचालक हालेस उर्फ बबन बारदेस्कर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. सविता बारदेस्कर, अनिल भोई यांचेसह शेणगाव ग्रामस्थ व गारगोटी येथील मित्र परिवार उपस्थित होते.