राधानगरी धरणाचा दरवाजा अचानक उघडलाच कसा! : दोषींवर कारवाई होणार का?; लाखो लिटर पाणी वाया, नदीकाठचे पाणीपुरवठा करणारे पंप पाण्याखाली
उघडलेला तीन नंबरचा गेट बंद करण्यासाठी दीड तासाचा अवधी लोटला आणि यंत्रणेला यश मिळाले.ही घटना नेमकी कशी घडली व घडलेल्या घटनेचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी अनेक उपस्थित ग्रामस्थांनी या वेळी केली. तर राधानगरी भाजपाचे संभाजी आरडे,सुहास निंबाळकर,यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी केली.

शाहू महाराजांनी उभा केलेल्या व या वर्षी महापुराच्या काळात पाण्याचे योग्य नियोजन केलेल्या राधानगरीच्या लक्ष्मी तलावाचा दरवाजा क्रमांक तीन अचानक उघडल्यामुळे १६७ दशलक्ष घनफुट पाणी साठा वाया गेलाच व धरणाची एक ते दीड फूट पाणी पातळी कमी होऊन नदीपात्रात पाच हजार क्यूसेक पाणी विसर्ग सहा ते सात तास सुरू होता.त्यामुळे भविष्यात पाणी साठा पुरणार का हा यक्ष प्रश्न आहे.व येणारा काळच ठरवणार आहे.ही घटना नेमकी कशी घडली याचे कारण काय या बाबत सर्वचजण अनभिज्ञ असून सी.सी.टी व्ही फुटेज पाहून ही घटना कशी घडली त्याची कारणमीमांसा तपासून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे व भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाईल.असे शाखा अभियंता समीर निरोके,राधानगरी यांनी दैनिक महाभारतशी बोलताना सांगितले. आजपर्यंतच्या धरण इतिहासातील राधानगरी धरणाचा अचानक दरवाजा उघडून नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग होणारी ही इतिहासातील पहिलीच दुर्देवी घटना मानावी लागेल.ही घटना वाऱ्यासारखी पसरताच सर्वत्र भितीचे वातावरण पसरले.
याबत अधिक माहिती अशी.गेल्या काही दिवसांपासून धरणावरती येथील गंजलेल्या प्लेटा बदलण्याचे काम बाहेरील कर्मचारी यांचे मार्फत सुरू आहे.काल बुधवार सकाळी अचानक ८.४५ वाजता धरणाचा दरवाजा उघडला गेल्याची बातमी सोशल मीडियावरून वाऱ्यासारखी पसरली. धरणावरती व नदीकाठच्या गावात भीती निर्माण झाली.तसेच राधानगरी प्रशासनाकडून गावोगावी सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.उघडलेल्या धरणाच्या दरवाजमुळे सर्वत्रच भीतीचे वातावरण तयार झाले.अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वांची तारांबळ उडाली. अनेक शेतकऱ्यांना ही माहिती समजताच नदीकाठी धाव घेत मोटारपंप वाचवण्याची केविलवाणी धडपड केली.त्यात काहीजणांना यश आले तर अनेकांचे पंप बुडाले गेले दरम्यान घटनास्थळी प्रांताधिकारी पोलीस प्रशासन ,तहसीलदार प्रशासन ,पंचायत समिती सभापती,सर्व सदस्य,अधिकारी यांनी भेट दिली व घटनेची माहिती जाणून घेतली.
उघडलेला तीन नंबरचा गेट बंद करण्यासाठी दीड तासाचा अवधी लोटला आणि यंत्रणेला यश मिळाले.ही घटना नेमकी कशी घडली व घडलेल्या घटनेचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी अनेक उपस्थित ग्रामस्थांनी या वेळी केली. तर राधानगरी भाजपाचे संभाजी आरडे,सुहास निंबाळकर,यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी केली.
दरम्यान जलसंपदा विभाग यांच्याकडून हा दरवाजा बसविण्यासाठी कोल्हापूरवरून यांत्रिक विभागाकडून दुपारी १.३० प्रयत्न सुरू झाले.अवघ्या दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर या विभागाला यश आले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.आपत्कालीन गेट बसविण्यासाठी यांत्रिक विभाग कोल्हापूर (जलसंपदा) व पाटबंधारे विभागामार्फत कार्यकारी अभियंता,रोहित बांदिवडेकर,शाखा अभियंता राधानगरी समीर निरोके,अधीक्षक अभियंतता सुर्वे,उप अभियंता माने,होळणकर,शाखा अभियंता संदीप पवार, दिपक मोरे,दिलीप मगर,दिलीप मोरे,तसेच राधानगरी, धामोड,भाटनवाडी, येथील अधिकारी व कर्मचारी,यांनी विशेष परिश्रम घेतले.
फेजीवडेत संसार उपयोगी साहित्य गेले वाहून :
दरवाजा उघडला गेल्या मुळे प्रथमतः धरणाशेजारी असलेल्या गावाला याचा फटका बसतो. येथील पाणवठ्यावरील काही जणांचे भांडी, अंथरून पांघरून वाहून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले तर मोटार पंपाचे मोठे नुकसान झाले.
लाखो रुपयांची विज वाया
धरणातून वाया गेलेले पाणी विजगृहाला मिळाले असते तर लाखो रुपयांची वीज या पाण्यावर तयार झाली असती. त्याचा वापर जनतेसाठी झाला असता.