जीवनमंत्रताज्या बातम्यामनोरंजन
चंदगड तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस; शिवारासह शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी.

चंदगड प्रतिनिधी :
अन्न वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांपैकी अन्न पिकवणाऱ्या बळीराजाला नेहमीच अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी व योग्य हमीभाव या दुष्टचक्रात शेतकरी अडकलेला आहे. सध्या गेल्या आठ-दहा दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने वर्षभर शिवारात राबुन, मेहनत करून पिके घेण्यात आलेली शेतकऱ्याची सारी मेहनत वाया गेली. सुगी हंगामाची लगबग सुरू असताना ऐन सुगीच्या हंगामात अवकाळी पावसाला प्रारंभ झाला आणि या पावसाने शेतकऱ्यांच्या शिवारात सह डोळ्यात ही पाणी आणले आहे.आज( बुधवार) सकाळ पासूनचं मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने चंदगडात हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्याच्या भात व नाचणा पिकाचं पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.