आरोग्याकडे संपत्ती म्हणून पाहणे गरजेचे; आरोग्य शिबिर उद्घाटनावेळी माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत यांचे प्रतिपादन

सेनापती कापशी :
लोकांनी आरोग्याकडे संपत्ती म्हणून पाहणे गरजेचे असून आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी करणे काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत यांनी व्यक्त केले.
हसुर बुद्रुक तालुका कागल येथील आरोग्य शिबीर उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ग्रामीण भागात या सर्व लोकांनी आपल्या आरोग्याची तपासणी वेळोवेळी करून घेणे गरजेचे असल्याचे सांगून कोरोना सारखा महाभयंकर आजार आपल्याला बरेच शिकवून गेला असून स्वच्छता आणि उत्तम आरोग्य याचे महत्त्व या आजारामुळे लक्षात आले असून ग्रामीण भागातील लोकांनी स्वच्छतेबरोबर आपल्या सदृढ आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे असे मत व्यक्त करुन आरोग्यासाठी लागणाऱ्या सर्व मदतीसाठी मी सदैव तत्पर असून चिकोत्रा खोऱ्यातील गरजू लोकांना हवे ते सर्व प्रकारचे सहकार्य करणार असल्याचे मत शशिकांत खोत यांनी व्यक्त केले.
आरोग्य शिबिरामध्ये १५० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य ते औषधोपचार पूर्णपणे मोफत करण्यात आले.यावेळी माजी उपसभापती दीपक सोनार, सरपंच सोनू पाटील, उपसरपंच पुरुषोत्तम साळुंखे, रंगराव पाटील, सुरेश शिंदे, बाबुराव भोसले, डॉ चंद्रकांत परकाळे, एस आर पाटील, कापशी आरोग्य केंद्राचे कर्मचारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.