जीवनमंत्रताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरोग्य विभाग परीक्षा : आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या नियोजनाचा बोजवारा, पुणे, नाशिकमध्ये विद्यार्थी संतप्त

पुणे : 

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत गोंधळ निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. पुण्यातील आझम कॅम्पस येथील परीक्षा केंद्रावर 10 ची वेळ देण्यात आलेली असताना तिथे पर्यवेक्षक, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नसल्याचं समोर आलं आहे. परीक्षा केंद्रावर सुपरवायझर आले नसल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. नाशिकमध्ये देखील परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ उडालेला आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा एकदा सावळा गोंधळ झाला आहे.

विद्यार्थी संतप्त

पुण्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षेत मोठा गोंधळ निर्माण झाल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाल्या आहेत. तर, काही जणांना प्रश्नपत्रिका मिळालेल्या नाहीत. आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी राज्य सरकार, आरोग्य विभागाविरोधात संताप केला आहे. आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळं विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. दोन दोन वेळा परीक्षा द्यायला यावं लागतंय. सिंधुदुर्ग, बीड मधून विद्यार्थी पुण्यात परीक्षेसाठी दाखल झाले होते. विद्याऱ्यांनी तीन तीन हजार रुपये खर्चून परीक्षेसाठी आलो असल्याचं म्हटलंय. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी इथं पोहोचलं पाहिजे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks