ताज्या बातम्यामहाराष्ट्र
शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज येथील रसायनशास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रा.डॉ. एस डी पाटील यांचे निधन

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
नेसरी गावचे सुपुत्र, एक अभ्यासू व्यक्तिमत्व प्रा.डॉ. एस डी पाटील (वय 58) यांचे गडहिंग्लज येथे आकस्मित निधन झाले. एक उत्तम वक्ता व स्पर्धापरीक्षा मार्गदर्शक म्हणून आजरा ,गडहिंग्लज व चंदगड तालुक्यासह जिल्ह्यात ते परिचित होते. शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज येथे रसायनशास्त्र विषयाचे विभागप्रमुख तर नेसरी वाचन मंदिर नेसरी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे,आई, वडील, बहीण भाऊ असा परिवार आहे.