ताज्या बातम्या

चारशेचा हप्ता दिल्याशिवाय उसाचे कांडे तोडू देणार नाही ; माजी खा. राजू शेट्टी यांचा कारखानदारांना इशारा ; बिद्री कारखान्यावर ‘ स्वाभिमानी ‘ ची आक्रोश पदयात्रा

बिद्री ( प्रतिनिधी : अक्षय घोडके )

              गेल्या वर्षी बाजारात साखरेचा दर ३२०० रुपये क्विंटल होता. तेंव्हा कारखान्यांनी तीन हजार रुपये दर दिला. आता साखरेचा दर ३८५० रुपये क्विंटल झाला आहे. इथेनॉलचे एक टक्के वाढीव धरले तर १६१ रुपये प्रती टन वाढतात. हे साधे गणित धरुनच आम्ही गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला ४०० रुपयांची मागणी केली आहे. चारशेचा दुसरा हप्ता दिल्याशिवाय यंदा उसाचे कांडे तोडू देणार नाही ; असा सज्जड इशारा माजी खा. राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना दिला.
             गेल्या वर्षी गाळप केलेल्या उसाला ४०० रुपये अतिरिक्त द्यावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रोश पदयात्रेचे आयोजन केले आहे. ही पदयात्रा आज बिद्री ( ता. कागल ) येथील कारखान्यावर पोहोचली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. राजू शेट्टी यांनी मागण्यांचे निवेदन बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आम. के. पी. पाटील यांना दिले. यावेळी संचालक मधुअप्पा देसाई, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, कार्यकारी संचालक के. एस. चौगले आदी उपस्थित होते.            माजी खा. शेट्टी म्हणाले, गेल्या वर्षी हंगामाच्या सुरवातीला बाजारातील साखरेचे भाव पडले. तेंव्हा कारखान्यांनी साखरेच्या पोत्यावर काढलेल्या कर्जाचे व्याज वाढत आहे, याची जाणीव ठेवत आम्ही एफआरपीवर समाधान मानले. परंतू आता साखरेचा दर वाढल्याने कारखान्यांकडे पैसे शिल्लक आहेत. आमची मागणी व्यवहार्य असून ती मान्य न करणाऱ्या कारखान्यांतून साखरेचा एक कणही बाहेर पडू दिला जाणार नाही.
          याप्रसंगी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, युवा आघाडी जिल्हाधक्ष अजित पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बिद्री परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks