ताज्या बातम्या
शिवसेना प्रणित – मेहतर रूखी वाल्मिकी (स्वतंत्र) विभागाच्या राज्य उपाध्यक्ष पदावर सुरेश तामोत यांची नियुक्ती

विशेष प्रतिनिधी :
शिवसेना मुख्य नेते आदरणीय, एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार शिवसेना प्रणित – मेहतर रूखी वाल्मिकी (स्वतंत्र) विभागाच्या राज्य उपाध्यक्ष पदावर सुरेश तामोत यांची नियुक्ती राज्य समन्वयक मुकेश सारवान यांनी केली आहे.
मेहतर,रूखी,वाल्मिकी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ व अनुसूचित जाती प्रवर्गातील १३ टक्के आरक्षण मधून शैक्षणिक,नोकरी व राजकीय विशेष आरक्षण मिळावे यासाठी मुकेश सारवान यांच्या नेतृत्वांत प्रभावीपणे प्रयत्न करू असे सुरेश तामोत यांनी म्हटले आहे.

राज्य उपाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.