ताज्या बातम्यामहाराष्ट्र
वाघापूरची नागपंचमी यात्रा रद्द

वाघापूर प्रतिनिधी :

श्रीक्षेत्र वाघापूर (ता. भुदरगड) येथे शुक्रवारी (दि. १३) होणारी ज्योतिर्लिंगाची नागपंचमीची यात्रा कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती ज्योतिर्लिंग स्थानिक देवस्थान समितीचे अध्यक्ष अरविंद जठार, उपाध्यक्ष सदाशिव दाभोळे व सदस्य यांनी दिली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असल्याने मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार नाही.
दरवर्षी या यात्रेसाठी लाखो भाविक वाघापूरमध्ये दाखल होतात. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यात्रेच्या दिवशी गर्दी होऊ नये यासाठी मंदिरासमोरील परिसर बंद करण्यात आला आहे.