हनुमान तरूण मंडळाचा रक्तदान विधायक उपक्रम : स.पो.नि. विकास बडवे ; ४० जणांनी केले रक्तदान

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मानवाने नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करूण संशोधन केले. मानवी जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न केला.तरी देखिल कृत्रिमरीत्या रक्त करता येत नाही. मानवाला रक्ताचा पर्याय शोधता आलेला नाही.रक्त एखाद्या कारखाण्यामध्ये तयार करता येत. नाही किंवा प्राण्यांचे रक्त मानवाला उपयोगी पडत नाही.एका मानवाचेच रक्त दुसर्या मानवाला द्यावे लागते.त्यामुळे मानवी जीवनामध्ये रक्तदान हे सर्वक्षेष्ठ दान आहे.कोरोना संकटात रक्ताचा तुटवडा भासत आहे. गणेशोत्सवानिमित्त रक्तदान उपक्रम घेऊन हनुमान तरूण मंडळाने विधायक उपक्रम आहे.असे प्रतिपादन मुरगूड पोलिस ठाण्याचे स.पो.नि.विकास बडवे यांनी केले
भडगाव ता कागल येथे गणेशोत्सवनिमित्त आयोजित रक्तदान शिबिर च्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते या वेळी तब्बल ४०जणांनी रक्तदान केले.या वेळी डाॅ.डि.वाय पाटील हाॅस्पीटल चे वैद्यकीय पथकाचे डाॅ.बी जी कांबळे, डाॅ.अमित सोनवणे, डाॅ.नजीर जमादार, असिफ हवलदार, जयसिंग नागरे यांनी रक्त संकलन केले.
या वेळी स्वागत व प्रास्ताविक एकनाथ पाटील यांनी केले. यावेळी अमोल पाटील, आनंदा पाटील, प्रविण पाटील, अजित पाटील, पांडूरंग पाटील, संजय सुतार, रघुनाथ चव्हाण, डाॅ.संजय पाटील, भूषण पाटील, निकेश पाटील, हिंदूराव पाटील, सुनिल सुतार, विठ्ठल पाटील, अभिजीत पाटील, संग्राम भांडवले, सुरज सुतार, सुशांत पाटील, राहूल पाडळकर, ओंकार लाड, वारके, राजेश पाटील, भगवान पाटील, वैष्णव सुतार, अनिकेत पाटील उपस्थित होते.