सोनाळी येथील वरद पाटील याचा अमानुषपणे खून करणाऱ्या मारूती उर्फ तुकाराम वैद्य यांस मरेपर्यंत फाशी द्या : सतिश माळगे

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
महाराष्ट्र पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर शाहू नगरीमध्ये आज ही अघोरी प्रथा सुरू आहे कागल तालुक्यातील सोनाळी येथील ७ वर्षाच्या वरद पाटील याचा अमानुषपणे खून करून सावर्डे बुद्रुक परिसरातील खुळा पिंपळ म्हणून ओळखला जाणार्या ठिकाणी आघोरी जादूटोणा पद्धतीने नरबळी देऊन अमानवी कृत्य करून लहान वरदचा खून केला आहे आजही अशा पद्धतीच्या घटना वाचताना मन सुन्न होऊन जात आहे ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे अशा पद्धतीच्या घटना पुन्हा घडू नये म्हणून राज्यशासन तसेच प्रशासनाने कठोर पावले उचलायला पाहिजे वरद पाटील याचा आघोरी जादूटोणा पद्धतीने खुन होवून ही पोलीस प्रशासन त्यांच्या कुटुंबीयांवर दबाव टाकत आहेत पोलीस प्रशासनाने योग्य पद्धतीने तपास करावा.
१) वरद पाटील याच्या मारेकर्यास मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी.
२) तपासामध्ये ज्या मांत्रिकाने अशा पद्धतीची आघोरी जादुटोना नरबळी देऊन मुले होतात असे सांगणार्या मांत्रिकाचा शोध घेऊन त्याच्यावरही नरबळी जादूटोणा आघोरी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा.
३) मारुती उर्फ दत्तात्रेय उर्फ तुकाराम वैद्य याच्यावर नरबळी जादूटोणा अघोरी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा.
४) या न्यायालयीन खटल्यास ज्येष्ठ विधिज्ञ ऍड.उज्वल निकम यांची नियुक्ती करावी.
या मागण्यांसाठी ऐतिहासिक दसरा चौका येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली तसेच या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी मा: भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात जेष्ट नेते आयु:किरन नामे, पन्हाळा तालुक्याचे अध्यक्ष आयु:भारत सोरटे,राधानगरी तालुक्याचे अध्यक्ष आयु:कुंडलिक कांबळे, SRP चे जिल्हा अध्यक्ष आयु:धनाजी सकट, जिल्हा नेते आयु:सतीश माळगे (दादा), आयु:प्रदीप ढाले,रवी कांबळे,महादेव सोरटे,सनि बाचने,निलेश कांबळे,सदाशिव कांबळे, संबोधी कांबळे,निशांत कांबळे,सतीश जाधव,विजय गोंदणे, सौरभ कुरणे,सुमित कांबळे, साताप्पा कांबळे,विठ्ठल चौगुले,विजय भोसले, शैलेश कांबळे,अभिजीत धनवडे,रुपेश कदम,स्वप्नील चव्हाण,सुरज कांबळे, प्रथमेश कांबळे,संपत घोलप,सलमान मौलवी,प्रवीण निगवेकर,अफजल मुजावर,शाहरुख मुजावर,रशीद मुजावर,शिवाजी माने,प्रवीण आजरेकर,विनोद कांबळे,शिवबार ऋग्वे,विशाल कांबळे,अरमान मौलवी, संदीप सांगावकर यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.