आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ यात्रा रद्द

आप्पाचीवाडी प्रतिनिधी :
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आप्पाचीवाडी (ता. निपाणी) येथील दि. 21 ते 25 ऑक्टोबर या काळात दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात साजरी होणारी यंदाची श्री हालसिद्धनाथ देवाची यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली.शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयात पोलिस प्रशासन, प्रमुख मानकरी, यात्रा कमिटी, ग्रामपंचायत प्रशासन, सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार हे होते. यावेळी बोलताना उपनिरीक्षक अनिलकुमार म्हणाले की, सद्यस्थितीत कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी धोका टळलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये कोणतीही यात्रा, जत्रा व सामूहिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिलेली नाही .त्यामुळे ग्रामस्थ,भक्तगण तसेच व्यापारी वर्गाने यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.