चंदगडात खड्ड्याचा हैदोस, तालुक्यात ठीकठिकाणी रस्तेचं गायब; लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील का?

चंदगड प्रतिनिधी :
कोल्हापूर जिल्हातील शेवटचं टोक असणारा चंदगड तालुका. तालुक्यात महत्वाच्या मार्गांवरही ठिकाठिकाणी खड्डे पडल्याने विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा ईरणीवर आला आहे.गेल्या दोन वर्षांपासूनच्या वाहन चालवताना सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून आता प्रवासी ही आक्रमक होताना पाहायला मिळतं आहेत .
तालुक्यातील महत्वाचा मार्ग समजला जाणारा बेळगाव-वेंगुर्ला मार्ग यावर ही दर अर्ध्या किलोमीटर वर मोठे खड्डे पडल्याने रात्रीच्या वेळी गाडी चालवताना सुरक्षेचा मोठा प्रश्न उपस्थित होतोय.तर कोल्हापूर हुन चंदगड ला जात असताना पहिल्या सीमेपासून (मलगेवाडी पासून नागणवाडी ) 12 किलोमीटरवर रस्ताची दुरवस्था पाहायला मिळते. या ठिकठिकाणी अर्धवट रस्ता, वाळकुळी नजदिक पडलेले मोठं मोठे खड्डे हे सर्व अपघाताला निमंत्रण देण्यासारखं आहे. हेरे भागात ही सध्या हीच परिस्थिती असून रस्ताच्या नावाने गेले अडीच वर्ष झाडें तोडून नेमका कुणाचा विकास झाला हा प्रश्न आता सर्वसामान्यना पडत आहे.खरंतर गेल्या चार वर्षांपासून हा रस्ता व प्रश्न असाच प्रलंबीत आहे याकडे लोकप्रतिनिधी आता तरी लक्ष देतील का?? असा प्रश्न सध्या वाहनधारकांकडून उपस्थित होतोय.