#हादगा_विशेष : ग्रामीण भागात आजही खेळला जातोय हादग्याचा खेळ

शब्दांकन : वजीर मकानदार
आजच्या 21 व्या शतकात, अन मोबाईलच्या दुनियेत तग धरून राहिलेला हादगा हा खेळ कडगांव हायस्कुल व श्री समर्थ क.महाविद्यालय कडगांव या माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींच्या कडून खेळला जाताना दिसून येत आहे.
एक पर्जन्यविधी आणि व्रत. हस्तग म्हणजे सूर्य. तो हस्त नक्षत्रात जातो तो ह्या विधीचा काळ होय. हस्त नक्षत्रात हत्ती पाण्यात बुडेल इतके पाणी बरसावे, अशी समजूत आहे. हे व्रत त्या समजुतीशी निगडित आहे.
आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राचा आरंभ होतो. त्या दिवसापासून पुढचे सोळा दिवस किंवा नवरात्राच्या पहिल्या दिवसा-पासून पौर्णिमेपर्यंत हदग्याच्या निमित्ताने मुली एक खेळ खेळतात. ह्या खेळाला हदगा म्हणतात. तसेच यास भोंडला असेही नाव आहे. हस्त नक्षत्र सुरू झाल्यापासून हादगा हा खेळ खेळला जातो, लोककथांनुसार हस्तांच्या पावसात मनोरंजन म्हणून घरीच मुली फेर धरून हदग्याचा खेळ खेळायच्या हादगा सण हत्तीचे प्रतीक म्हणून दोन हत्तीचा फोटो, मूर्ती किंवा पटावर हत्तीची रांगोळी मधोमध ठेवली जाते. एलेमा पैलेमा गणेश देवा, माझा खेळ मांडु दे करिन तुझी सेवा हे हादग्या चे प्रसिद्ध गाणे सोळा दिवसाच्या कालावधीत रोज एक गाणे वाढविले जाते.
रोज वेगवेगळ्या पदार्थांची खिरापत या खेळात वाटली जाते हा पारंपरिक खेळ आज ही या संगणकीय युगात जपला आहे तो या विद्यालयातील विद्यार्थिनींनी व त्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक एल.जी.हावलदार, मराठी चे शिक्षक एम.व्ही.लाड, सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे.